"प्रत्येक कामाचा एक टक्का घेतो", भ्रष्ट अभियंत्याचा Video पुढे, बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बीड जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंताचा टक्केवारी घेतानाचा व्हिडिओ देत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Beed Corruption News Updates
Beed Corruption News Updatesविनोद जिरे
Published On

विनोद जिरे

बीड: जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याचा, टक्केवारी मागतानाचा व्हिडिओ व लेखी तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांना देत कारवाईची मागणी केल्यानं, बीडमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या तक्रारीत दिलेला व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. या व्हिडिओत"प्रत्येक कामाचा एक टक्का घेतो" ड्रायव्हरकडे पैसे द्या. अस संभाषण आहे. त्याच व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती पैसे घेत असताना दिसत आहे. या घटनेने खळबळ उडालीय. तर या व्हिडिओची पुष्टी साम टीव्ही करत नाही. (Beed Corruption News Updates)

बीड जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. हाळीकर यांच्या विरोधात ही तक्रार असून यासंदर्भात हाळीकर यांना विचारले असता, हा व्हिडीओ बनावट आहे. व्हिडिओमधील आवाज माझा नाही, चुकीचा खोडसाळपणा कोणीतरी केला आहे.या संदर्भात वरिष्ठाना मी कळवलं आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तक्रार करणार असल्याचे हाळीकर यांनी सांगितले.

Beed Corruption News Updates
...अन् तरुणाने मृत्यूला दिला चकवा; पहा काळजाचा ठोका चुकवणारा थरारक Video

तसेच, कार्यकारी अभियंता पी. जी. हाळीकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या विरोधात अशोक काळकूटे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हिडिओचा पुरावा देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारी अर्जात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार देऊनही, या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घातलं असल्यामुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर देखील कारवाई केली जावी. अशी मागणी तक्रारदार अशोक काळकुटे यांनी केली आहे.प्रशासनाने या भ्रष्ट आणि लाचखोर अधिकाऱ्यासह सहपरिवार आणि नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी करावी. अशीही मागणी केली आहे. दरम्यान, हाळीकर याची संपूर्ण संपत्ती आणि बँक खातेही सील करण्यात यावेत. अशी मागणी केली आहे. बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही निवेदन देण्यात आले आहे. (Beed Latest News Updates)

या घटनेमुळे खळबळ उडाली असून तक्रारदार अशोक काळकुटे यांनी 23 डिसेंबर 2021 ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कार्यकारी अभियंता पी.जी हाळीकर यांची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. मात्र या चौकशीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काहीच कारवाई न केल्यामुळे, तक्रारदार यांनी थेट व्हिडिओ पुरावा देत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यामुळं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात नेमक अधिकारी आणि गुत्तेदार यांमध्ये काय सुरू आहे ? यासंदर्भात उलटसुलट चर्चा केली जात आहे. दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता संजय कोकणे याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र लिहीत.. स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हरची मागणी केली होती.

हे देखील पहा-

पी.जी. हाळीकर हा प्रत्येक कामाचे बील काढण्यासाठी एक टक्क्यानुसार सर्रास मागणी करून एक टक्क्यानुसारच पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. या लाचखोर अधिकाऱ्याने आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांची लाच घेतल्याची तक्रार अशोक काळकुटे यांनी केला आहे. बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनीही कुठलीच दखल न घेतल्याने त्यांच्यावर देखील प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाने बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे. परंतु अशा भ्रष्ट आणि लाचखोर अधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com