Chandrapur : असा दुर्मिळ साप कधी पाहिलात का ? जहाल विषारी म्हणून ज्याची आहे नाेंद

गडचिरोली जिल्ह्यात हा साप आढळल्याची नोंद आहे.
common krait snake, chandrapur, snake
common krait snake, chandrapur, snakesaam tv news
Published On

Chandrapur : जहाल विषारी साप म्हणून ज्याची नोंद आहे असा दुर्मिळ पट्टेरी मण्यार साप चंद्रपूर जिल्ह्यात आढळला. दरम्यान सर्प मित्रांनी वनविभागाला माहिती देत मोठ्या शिताफीने सापाला पकडुन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

पट्टेरी मण्यार भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, आसाम, बिहार व पूर्व महाराष्ट्रातील वैनगंगा नदीकाठच्या भागात आढळून येतो. ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे.

common krait snake, chandrapur, snake
Chandrapur : ब्रम्हपुरी-गडचिरोली मार्ग बंद; दळणवळण ठप्प (व्हिडिओ पाहा)

ब्रम्हपुरी शहरातील पेठ वॉर्डात एका घरात हा साप असल्याची माहिती मिळाल्यावर सर्पमित्र गणेश सातरे, सार्थक मेहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना घरात चार फूट लांबीचा पट्टेरी मण्यार आढळला. सर्पमित्रांनी वनविभागाला माहिती देत मोठ्या शिताफीने सापाला पकडुन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

common krait snake, chandrapur, snake
Vinayak Mete Accident Case : विनायक मेटेंच्या अपघाताची चाैकशी एसआयटीकडून व्हावी : राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस

ब्रम्हपुरीतील नागरिकांनी सर्पमित्रांच्या कार्याचे आणि धाडसाचे काैतुक केले. हा साप जहाल विषारी असला तरी मानवाला दंश केल्याच्या नोंदी दोन्ही जिल्ह्यात नसल्याची माहिती पुढे आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

common krait snake, chandrapur, snake
Chiplun : प्रशासनानं वाशिष्ठी नदी काठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com