Gondia News | गोंदियाच्या गंभीर घटनेची कमांडट रागसुधा आर यांनी घेतली दखल

सदर प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी जालनाच्या राज्य राखीव दलाच्या कमांडट रागसुधा आर या ८ ऑगस्ट रोजी गोंदियात पोहोचल्या आहेत.
Ragasudha R
Ragasudha R saam tv

gondia news : गोरेगाव तालुक्यातील एका ३५ वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना गोंदिया (Gondia) आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या हद्दीत घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर या घटनेवर लोकांकडून संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सदर प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी जालनाच्या राज्य राखीव दलाच्या कमांडट रागसुधा आर या ८ ऑगस्ट रोजी गोंदियात पोहोचल्या आहेत. (Gondia News )

Ragasudha R
Video | 'आम्हाला ज्यांनी वेगवेगळी नावे दिली, त्यांना...'; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर साधला निशाणा

सदर सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन्ही जिल्ह्यातील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल राज्य सरकारने घेतली असून या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपाविण्यात आला आहे. यासाठी राज्य राखीव दलाच्या कमांडट रागसुधा आर यांची नियुक्ती केली आहे. तसेच या तपास कार्यासाठी त्यांच्या मदतीला गोंदिया जिल्ह्यातून तीन अधिकारी व सहा पोलीस कर्मचारी असे नऊ लोक देण्यात आले. यात एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एसआयटीकडून किती कर्मचारी दाखल झाले याची माहिती देण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून गुप्तता पाळण्यात आली आहे.

Ragasudha R
झेंड्याचं कंत्राट गुजरातकडेच कसं ? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

दरम्यान, रागसुधा यांनी आज सोमवारी जिल्ह्यात दाखल होत तातडीने या प्रकरणाच्या तपास कार्याला सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक माहिती आणि घटनेचे बारकावे त्यांनी जाणून घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, हे प्रकरण निष्काळजी करण्यास उशीर करणाऱ्या लाखनी येथील दोन पोलिसांना सोमवारी तातडीने निलंबित करण्यात आले आहे. तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मुख्यलयाची बदली करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या तपासात आणखी काय तथ्य पुढे येते याकडे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेची लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com