धक्कादायक! 'बाय बाय'चे स्टेटस ठेवत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

मृत्यूदेह शेवविच्छेदनासाठी बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे
Aurangabad News
Aurangabad Newsअविनाश कानडजे
Published On

अविनाश कानडजे

औरंगाबाद - मोबाईलवर (Mobile) बाय बायचे स्टेटस ठेवत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील ताजनापुर गावात उघडकीस आली आहे. राजेश ज्ञानेश्वर काळे असे मृत अठरा वर्षीय युवकाचे नाव आहे. राजेशने घरातील सर्व व्यक्ती शेतात कामाला गेलेले असतांना स्वतःच्या मोबाईल वर बाय बाय स्टेटस ठेवले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे देखील पहा -

मिञांनी राजेशचे हे स्टेटस बघुन राजेशचा शोध घेतला असता त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली, या घटनेची माहिती बाजारसावंगी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने युवकाचा मृतदेह खाली उतरवला. मृत्यूदेह शेवविच्छेदनासाठी बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. या युवकाने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com