मुंबई - ठाणे या २४ तास धावणाऱ्या शहरांची वाहतूक मंदावलीये. त्याला कारण ठरलं सीएनजी. याच सीएनजी गॅसनं रिक्षाचालकांना रांगेत आणि प्रवाशांना प्रतिक्षेत बसवलंय. सोमवारी महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं शहरातील सीएनजी गायब झाला. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा-टॅक्सी ठप्प झाल्या. प्रत्येक सीएनजी पंपावर रिक्षाचालकांच्या आणि टॅक्सीचालकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या.
सीएनजी अभावी ठाणे - मुंबईतील रिक्षा-टॅक्सीची सेवा बंद पडली आणि लाखो प्रवाशांना थंडीत घाम फुटला. कारण रिक्षा - टॅक्सीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे एकीकडे प्रंचड हाल आणि काही मस्तवाल रिक्षाचालकांकडून लूटमार सुरु झाली. मीटर बंद करुन वाटेल ते भाडं प्रवाशांकडून मागण्यात आलं. त्यामुळे तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला. याच वेळी प्रवाशांचे होणारे हाल पाहता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकांना ठाण्यात चांगलाच धडा शिकवला.
आपातकालीन परिस्थितीचा फायदा घेणारे हे रिक्षाचालक मुंबई ठाण्याच्या रस्त्यावर धूमाकुळ घालत असतांना प्रशासन मात्र सुस्त असल्याचं दिसत होतं. महानगरनं या सीएनजी पुरवठ्यावर प्रतिक्रीया देतांना कोणी एका माथेफिरुन होल पाडल्यानं सीएनजी पुरवठा खंडीत झाल्याचं म्हटलं. आणि लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणू असा दावा केला.
मुंबई ठाण्यातील सोमवार पासून वाहतूक व्यवस्थेची उडालेली दैना अनेक प्रश्न उपस्थित करुन गेली. एका माथेफिरूच्या चुकीचा लाखो प्रवाशांना आणि चालकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यानं साम टिव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत
महानगरच्या मुख्य पाईपलाईनला छिद्र कसं पडलं?
पाईपलाईनला छिद्रपडेपर्यंत महानगर प्रशासन काय करत होतं?
ज्वलनशील गॅस पाईपलाईची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडली होती का?
प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांवर कारवाई का नाही?
आपातकालीन परिस्थितीत प्रशासनानं पर्यायी व्यवस्था का केली नाही?
परिवहन मंत्री आणि त्यांचे मंत्रालय काय करत होतं?
सीएनजी गॅसनं प्रवाशांसोबतच सगळ्यांचीच कोंडी केली राज्यात टेस्लाची वाहनं चालवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रशासनाच्या फोल दाव्याची पुरतीच पोलखोल झाली. लाखो करोडोंचा टँक्स भरणाऱ्या चाकरमान्यांच्या हालात भर पडली आणि त्याचं कोणतंच सोयरं सुतक हे प्रशासनाला नाही हेच पुन्हा पाहायला मिळालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.