Raigad: भविष्यात औद्यगिक क्षेत्र वाढणार, आरोग्य सुविधा जिल्ह्यात असणे गरजेचे - मुख्यमंत्री

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला
raigad
raigadSaam Tv
Published On

रायगड: अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज उसर येथे पार पडला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड उपस्थित होते. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थित होते.

raigad
Sad News : जगभरातील कोट्यावधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले - शरद पवार

आरोग्य सुविधा जिल्ह्यात असणे गरजेचे - मुख्यमंत्री

हॉस्पिटल भूमिपूजन, नूतनीकरण काम हे कोरोना काळापासून सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोना (Corona) काळात उत्तम काम झाले आहे. अदिती तटकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी सतत पाठपुरावा केला आहे. भविष्यात औद्यगिक क्षेत्र वाढणार आहे. आरोग्य सुविधा जिल्ह्यात असणे गरजेचे आहे आणि अलिबाग येथे होत असलेले वैद्यकीय महाविद्यालय हे आरोग्य सेवा देण्यास सक्षम होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यावेळी व्यक्त केला.

हा काळ लसीकरण वाढविण्याचा आहे. साथ मंदावते तेव्हा पुन्हा लाट वाढण्याची शक्यता असते. कोरोनावर मी जास्त बोलत नाही. वडखळ येथे अपघात होत असल्याने ट्रामा केअर उभारणार आहोत. शिवरायांच्या भूमीत रुग्णालय होत आहे. भावी डॉक्टर रायगड भूमीतून तयार होणार आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, लवकरात लवकर ही इमारत बांधून तयार करावी, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com