Eknath Shinde News: बोगस बियाणे विक्रीवरून CM शिंदे आक्रमक; दिले कडक कारवाईचे आदेश

Eknath Shinde News: बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
eknath shinde news
eknath shinde news saam tv
Published On

Mumbai News: बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले. (Latest Marathi News)

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासावे. बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास अशांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता काटेकोर कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशात म्हटले आहे.

eknath shinde news
Ajit Pawar News: फडणवीसांपेक्षा शिंदेंना जनता अनुकूल, भाजपला मान्य आहे का? अजित पवारांचा सवाल

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने मदत मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

eknath shinde news
Maharashtra Employment: राज्यातील तरुणांना जर्मनीत मिळणार रोजगार! महाराष्ट्र सरकार देणार प्रशिक्षण

शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दर

मागी पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते. या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे.

शिंदे सरकारकडून त्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन सुधारित दराप्रमाणे जिरायत जमिनीसाठी ८ हजार ५०० देण्यात येणार आहे. तर बागायत जमिनीसाठी १७ हजार रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com