CM Eknath Shinde : आमदारकी वाचावी म्हणून काही जण सभागृहात येतात ; मुख्यमंत्री शिंदे यांनी भर सभागृहात कुणाला लगावला टोला?

Maharashtra Legislative Session : राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी पहायला मिळाली. विरोधकांवर सडकून टीका केली.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Digital
Published On

CM Eknath Shinde

राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी पहायला मिळाली. विरोधकांवर सडकून टीका केली. सरकार सर्वसामान्यांसाठी चांगले निर्णय घेत आहे, त्यामुळे चांगल्याला चांगलं म्हणा, विरोधाला विरोध करू नका. विरोधकांची नेहमी एकच‌ स्क्रिप्ट, एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट असतो, त्यामुळे चित्रपट फ्लॉप जातोय. तर काहीजण फक्त आमदारकी वाचावी म्हणून सभागृहात येतात, असा टोला उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे.

अंतरीम अर्थसंकल्प असताना सर्व घटकांना न्याय दिला आहे. ⁠काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी मध्येच हजेरी सभागृहात दाखवतात. सभागृहात आॅनलाईन उपस्थित राहता येत नाही म्हणून नाहीतर घरून उपस्थित झाले असते. ⁠सकाळी आपल्यासोबत चहा प्यायला असलेला नेता दुपारी आपल्या सोबत राहील की नाही हे सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. देशाला मोदींची गॅरंटी आहे. म्हणूनच अजित पवार इकडे आले, अशोक चव्हाण ही आले. तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल. विरोधी पक्षनेता कोमात गेलाय शेतकरी नाही. विकास सुरूय, पण तुम्हाला कळतंय पण वळत नाही.

तूर्तास मुंबईत कुठलीही पाणी कपात केली जाणार नाही. आशा कर्मचाऱ्यांना सरकार न्याय देईल, निराशा होऊ देणार नाही विरोधकांना शेतकऱ्यांचं देणेघेणे नाही. काय दिले त्याचा हिशोब द्यायचा होता,आकडे आमच्याकडे आहेत. त्यामुळे शेतकरी कोमात आहे, अशा भाषा योग्य नाहीत.शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तोंडाला पाने पुसली.तुम्ही ५० हजार दिले नाही, खात्यावर आम्ही जमा केले. पोकळ घोषणा तुमच्या, भरीव काम आमचे, असा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचला.

CM Eknath Shinde
Ek Maratha Lakh Maratha : मराठा समाजाने घेतले 10 महत्त्वपूर्ण निर्णय, एकमताने ठराव मंजूर

शेतकरी नव्हे तर विरोधी पक्ष कोमात गेले की काय? सरकार गेले हे मान्य करायलाच तयार नाहीत वस्तुस्थिती मान्य करा.वेगवान सरकार काम करत आहे. कळतंय पण वळत नाही. नागपूर अधिवेशन असताना मी व देवेंद्र फडणवीस स्वतः माती व चिखल तुडवत गेलो. शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का? असे प्रश्न कुणी मांडले होते. त्यांना शेतकऱ्यांना प्रश्न कळणार का. शेतकऱ्यांना योजना लागू केल्या आहेत. २९ हजार ५२० कोटी रुपये शेतकऱ्यांचा खात्यात जमा केले. १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी वर्षाला मिळत आहे. ८८ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे.

CM Eknath Shinde
Supriya Sule : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; बारामती मतदार संघातून स्वत:ची उमेदवारी केली जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com