Supriya Sule : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; बारामती मतदार संघातून स्वत:ची उमेदवारी केली जाहीर

Supriya Sule Whatsapp Status : सु्प्रिया सुळेंचा फोटो नाव आणि निशाणी देण्यात आलीये. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि निवडणूक निशाणी तुतारी फुंकणारा माणूस देखील आहे.
Supriya Sule
Supriya SuleSaam TV
Published On

Lok Sabha Election :

लोकसभा निवडणुकीबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी मोठी घोषणा केली आहे. बारामती मतदार संघातून त्यांनी स्वत:च आपली उमेदवारी घोषित केली आहे. आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर याबाबत एक स्टेटस अपलोड करत सुप्रिया सुळेंनी उमेदवारी जाहीर केली आहे.

Supriya Sule
Loksabha Election निश्चितीसाठी भाजपची समिती? #shorts | Marathi News

सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंचा फोटो आहे. तसेच पुढे सु्प्रिया सुळेंचा फोटो नाव आणि निशाणी देण्यात आलीये. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि निवडणूक निशाणी तुतारी फुंकणारा माणूस देखील आहे.

सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार त्याच असणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप याबाबत महाविकास आघाडीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जर महाविकास आघाडीमधून बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे असतील तर मग महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळेंनी मतदार संघातील विविध ठिकाणी जाऊन जाहीर कार्यक्रम घेत आहेत. अशातच महायुतीकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे. मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून आपल्या विकास कामांचा रथ देखील दाखवण्यात आला होता. त्यामुळे खरोखर आगामी निवडणुकीत नणंद आणि भावजय यांच्यात लढत पाहायला मिळणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Supriya Sule
Palghar Crime News : माथेफिरूकडून दोन सख्ख्या भावांची हत्या; धक्कादायक घटनेनं पालघर हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com