Refinery Project
Refinery ProjectSaam TV

Konkan Refinery: रिफायनरी नकोच; धोपेश्वरकरांनी दिला विरोधात कौल

Refinery ला समर्थन की विराेध यासाठी आज धाेपेश्वरात ग्रामसभेत ठराव सादर करण्यात आला होता यामध्ये गावकऱ्यांनी या रिफायनरीच्या विरोधात जास्त मतदान केलं आहे.

रत्नागिरी - धोपेश्वरमधील रिफायनरीसाठी (Dhopeshwar Refinery) आज धोपेश्वरमध्ये ग्रामसभेच आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेत रिफायनरी न होण्याबाबतचा विशेष ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे आता या रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या ग्रामसभेत रिफायनरीला विरोध करणाऱ्यांची मतं - 466 तर समर्थकांची मते - 144 असून उरलेले तटस्थ - 23 मते पडली आहेत.

Refinery Project
Breaking News: पंतप्रधान मोदी- शरद पवार भेटीत २०-२५ मिनिटे चर्चा; चर्चेला उधाण

कोकणातील (Konkan) रिफायनरी बारसू (Barsu) गावात होणार असल्याचे चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात बारसू गावचा उल्लेख केला आहे. तर, धोपेश्वर ग्रीन रिफायनरी असं या रिफायनरीचं नाव ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, याच गावची ग्रामसभाआज 6 एप्रिल रोजी आयोजित केली होती आणि आता या सभेमध्ये रिफानरीबाबत ठराव करण्यात आळा आहे तो या रिफायनरीच्या विरोधातच असल्याने धोपेश्वर मध्ये रिफायनरी होण्याची आशा मावळली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com