भंडारा: तुमसर तालुक्यातील झारली शेत शिवारात चितळाची शिकार प्रकरणात दोन आरोपींनी तुमसर वनविभागाने मोठ्या शिताफिने अटक केली आहे. लक्ष्मीकांत दसराम राहांगडाले रा. झारली आणि माणिकराम शोभाराम बडवाईक रा. पिपरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Chital Hunting In Bhandara)
हे देखील पहा -
तुमसर (Tumsar) तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून वन्यप्राणी मुक्तपणे विहार करतात मात्र अलीकडे शिकारीचेही प्रमाण वाढले आहे. दरम्यान वनविभागाला चितळाची (Chital) शिकार (Hunting) झाल्याची गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून वन अधिकारी व कर्मचारी झारली येथे पोहोचले असता गावाशेजारी माजी सरपंच भवानीशंकर रहांगडाले यांच्या शेतात चितळाची शिकार झाल्याचे दिसून आले. वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचताच आरोपी लक्ष्मीकांत रहांगडाले घटनास्थळावरून पसार झाला. चितळाचा पंचनामा करून त्याचे शिंग व इतर साहित्य जप्त करण्यात आले होते.
पसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभागाचे पथक आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी पिपरा येथे लपुन असल्याची माहिती मिळाली. लागलीच त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या 1952 वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कलम 9,39,52 अंतर्गत गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.