भंडारा : चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजविण्याचा प्रकार भंडाऱ्यात उघडकीस आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव टोली येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखनी वन विभागाने घरातून मांस आणि कुऱ्हाड जप्त केलीये. मात्र, आरोपी पसार झाला आहे. संजय मनोहर पोंगरे असे शिकाऱ्याचे नाव आहे (Bhandara Chital hunting and meat cooked at home Lakhani forest department took action).
भंडारा (Bhandara) येथील लाखनी वन विभागाला पिंपळगाव टोली येथील एका घरात चितळाचे मांस शिजत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरुन वन विभागाने संजय पोंगरे यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातील चुलीवर एका भांड्यात मांस शिजत असल्याचे दिसून आले. तसेच, घरात रक्ताने माखलेले प्लास्टिकचे पोते आणि एक कुऱ्हाडही सापडली. वन विभागाने हे सर्व साहित्य जप्त केले आहे. मात्र, यावेळी आरोपी पसार झाला असून लाखनी वन विभाग त्याच्या शोध घेत आहे.
लाखनी तालुका परिसर हा वन आच्छादित असल्याने वन्य प्राणी शिकार (Hunting) प्रकरण नेहमी घडत असल्याने वनविभागासमोर लोभी शिकाऱ्यांचे आवाहन नेहमीच राहते. आता याप्रकरणी वन विभाग तपास करत आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.