'शिंदे -ठाकरे' गट संघर्ष पेटला, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच आमदार सुहास कांदे यांचा पोस्टर फाडला

एकनाथ शिंदे गटाने बंडाळीचा झेंडा फडकवल्यानंतर राज्याच्या राजकारणात टीका-टीप्पणीचं सत्र सुरुच आहे.
Mla Suhas Kande Poster Torn
Mla Suhas Kande Poster Tornsaam Tv
Published On

नाशिक : एकनाथ शिंदे गटाने बंडाळीचा झेंडा फडकवल्यानंतर राज्याच्या राजकारणात टीका-टीप्पणीचं सत्र सुरुच आहे. शिवसेना पक्षप्रमुखपदावरुन आणि धनुष्यबाण चिन्हावरुन एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटात खडाजंगी होत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसैनिकांना आपल्या गटात सामील करुन घेत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि त्यांचे पुत्र आदित्य ठातरे निष्ठा यात्रा काढत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांनी (suhas kande) ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र, शिंदे गटाला समर्थन दिल्यानं कांदे यांच्यावर विरोधक जोरदार हल्ला करताना दिसत आहेत. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंत तांडा येथील स्टँडवर सुहास कांदे यांचे पोस्टर लावले होते. हे पोस्टर अज्ञात इसमाने फाडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शनिवारी होणाऱ्या नांदगाव दौऱ्याआधीच शिंदे गट आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष पेटला आहे.

Mla Suhas Kande Poster Torn
कमाल! लॉकडाउनमध्ये घरीच तयार केलं स्वतःचं ४ सीटर विमान; आता अख्खं कुटुंब जगभर फिरतंय

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंत तांडा येथे रस्त्यावर उभारलेल्या स्टँडवर सुहास कांदे यांचे पोस्टर लावले होते. अज्ञात व्यक्तीने कांदे यांचे पोस्टर फाडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.विशेष म्हणजे, कांदे हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत आणि शनिवारी मुख्यमंत्र्यांचा नांदगावमध्ये दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर कांदे यांचे पोस्टर फाडण्यात आले आहे.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मनमाडमध्ये नुकताच दौरा झाला आहे. त्यापाठोपाठ आता एकनाथ शिंदे हे स्वतः नांदगाव मतदारसंघात येत आहेत.

Mla Suhas Kande Poster Torn
Adhir Ranjan Chowdhury: राष्ट्रपतींबद्दल अपशब्द; काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी वादात; संसदेत गदारोळ, स्मृती इराणी आक्रमक

त्यामुळे कांदे गटाकडून त्याची जौरदार तयारी सुरू आहे. त्यातच पोस्टर फाडण्याचा प्रकार घडला आहे. पोस्टरवरील आमदार कांदे यांचे नाव अज्ञात लोकांनी मिटवल्याने कांदे यांच्या समर्थकांनी या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेमुळे यापुढे आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार कांदे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने अनेक कडवट शिवसैनिकांना कांदे यांची भूमिका पचनी पडलेली नाहीय. त्यामुळे शिवसैनिकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. दरम्यान, या घटनेमुळे कांदे गट आणि शिवसेना गट यांच्यात आगामी काळात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com