सीआरपीएफच्या पोलीस कॅम्पवर नक्षलवाद्यांचा हल्ला; 3 जवान जखमी

छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी CRPF च्या नवीन पोलीस छावणीवर हल्ला करण्यात आला
CRPF Police
CRPF PoliceSaam Tv

छत्तीसगड: छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी CRPFच्या नवीन पोलीस (Police) छावणीवर हल्ला (Attack) करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये (firing) CRPFच्या दुसऱ्या बटालियनचे ३ जवान जखमी झाले आहेत. तरी तिन्ही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Chhattisgarh Naxals attack CRPF police camp)

यावेळी सुकमा एसपी सुनील शर्मा यांनी दावा केला आहे की, जवानांच्या प्रत्युत्तरामध्ये अनेक नक्षलवादी देखील जखमी झाले आहेत. असे सांगण्यात येत आहे की, नवीन कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांनी (Naxalites) UBGL बरोबर हल्ला करण्यात आला आहे. तसेच ग्रेनेड लॉन्चर देखील केले आहे. परंतु, कोणतेही नुकसान झाले नाही. या पोलीस छावणीचे नुकतेच उद्घाटन करण्यात आल्याचे एसपी यांनी यावेळी सांगितले आहे.

हे देखील पहा-

चकमकीमध्ये नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यामधील चिंतागुफा पोलीस (Police) स्टेशन क्षेत्रात एलमागुंडा येथे उपस्थित असलेल्या CRPFच्या नवीन छावणीवर गोळीबार केला आहे. एलमागुंडा येथे उघडण्यात आलेले CRPF द्वितीय बटालियनचे हे नवीन कॅम्प चिंतागुफापासून १२ किलोमीटर अंतरावर आणि मीनपापासून सुमारे ५ किमी अंतरावर हे कॅम्प आहे. अशा परिस्थितीमध्ये नक्षलवाद्यांनी या नवीन छावणीला लक्ष्य केले आणि येथे जवानांवर गोळीबार करण्यात आला आहे.

CRPF Police
चीनमध्ये डोंगराला धडक लागल्याने 133 प्रवासी असलेलं विमान कोसळलं...(पहा Video)

चकमकीमध्ये ३ जवान जखमी

जवानांनी तत्काळ नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले आणि यादरम्यान CRPF चे ३ जवान जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हेड कॉन्स्टेबल हेमंत चौधरी, कॉन्स्टेबल बसप्पा आणि कॉन्स्टेबल ललित बाग यांचा समावेश आहे. जखमी जवानांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जवानांचे प्राण धोक्याबाहेर आहेत. चकमकीनंतर नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले आहेत, तर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारामध्ये अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा एसपींनी केला आहे.

झडतीच्या दरम्यान घटनास्थळी रक्ताचे डाग देखील दिसले आहेत. मीनपा येथे २०२० मध्ये २१ मार्च दिवशी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती आणि या चकमकीमध्ये २३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीमध्ये १७ जवान शहीद झाले होते. त्याच्याबरोबर नक्षलवाद्यांनी एक प्रेस नोट जारी करून जवानांच्या मृत्यूची माहिती दिली होती. नक्षलवाद्यांनी आपल्या साथीदारांचा बदला घेण्याकरिता २१ मार्च दिवशी पोलीस छावणीला लक्ष्य केले होते. परंतु, त्यांची योजना यशस्वी होऊ शकली नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com