चीनमध्ये डोंगराला धडक लागल्याने 133 प्रवासी असलेलं विमान कोसळलं...(पहा Video)

चीनमध्ये १३३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले
plane
plane Saam TV

वृत्तसंस्था: चीनमध्ये १३३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याविषयी याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. अपघातग्रस्त (Accident) विमान चायना (China) इस्टर्न एअरलाइन्सचे असून ते १३३ प्रवाशांना (passengers) घेऊन कुनमिंगहून ग्वांगझूला (Guangzhou) निघाले होते.

पहा व्हिडिओ-

यावेळी गुआंग्शी प्रदेशामध्ये या विमानाला (plane) अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे, तो डोंगराळ भाग असून अपघातानंतर डोंगरावर आग लागली आहे. दरम्यान, विमानामध्ये प्रवास करत असेलल्या प्रवाशांविषयी अद्याप कोणतीही माहिती समजू शकली नाही.

चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान क्रॅश (Crash) झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये १३३ प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. हे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला १३३ प्रवाशांना घेऊन जात होते. यावेळी या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला आहे.

plane
आपची घोषणा; माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगसह ५ जणांना राज्यसभेवर पाठवणार

या अपघात (Accident) झालेले विमान हे जेट बोईंग ७३७ विमान होते. या अपघातातील मृतांची संख्या मात्र अद्याप कळू शकलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com