VIDEO: 'मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा द्या', मराठा बांधव आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रास्ता रोको'; वाहतूक ठप्प

Maratha Reservation Manoj jarange Patil Latest News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील निवासस्थानी आणि आंदोलनाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अज्ञात ड्रोनद्वारे टेहळणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
VIDEO: 'मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा द्या', मराठा बांधव आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रास्ता रोको'; वाहतूक ठप्प
Maratha Reservation Manoj jarange Patil Latest News: Saamtv

रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ३ जुलै २०२४

मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरमधील मराठा बांधव आक्रमक झाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकात सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील निवासस्थानी आणि आंदोलनाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अज्ञात ड्रोनद्वारे टेहळणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर शहरातील केंब्रिज चौकात सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मनोज जरंगे पाटील यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या लोकांचा शोध घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

VIDEO: 'मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा द्या', मराठा बांधव आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रास्ता रोको'; वाहतूक ठप्प
Nanded Crime : भाजप पदाधिकाऱ्याचा ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे राहत असलेल्या अंतरवालीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्याचे समोर आले होते. याबाबत सरपंच पांडुरंग तारख यांनी माहिती देत जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते.

VIDEO: 'मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा द्या', मराठा बांधव आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रास्ता रोको'; वाहतूक ठप्प
Pune Porshe Accident: पोर्शे अपघातातून सुटला, फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला! विशाल अगरवालला पुन्हा अटक; प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com