
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच सिडको एनफोरमधील चैतन्यचे अपहरण आणि सुटका केल्यानंतर आज पुन्हा सकाळी एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. नागरिकांच्या सतर्कतेने ते अपहरण टळले. छत्रपती संभाजीनगर शहरातील N4 सिडको भागात पुन्हा एकदा अपहरणाचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला.
स्वराजनगर येथील १२ वर्षीय मुलगी सकाळी शाळेत जात होती. पुंडलिक नगर पोलीस स्टेशनपासून १०० मीटरच्या अंतरावरच बुलेटवर दोन अपहरकर्ते मास्क लावून आले. काही समजण्याच्या आत एकाने मुलीच्या चेहर्यावर स्प्रे मारला तर एकाने मुलीला उचलले. तेव्हा अशोक दामले, सुर्यकांत जाधव, दिलीप हरणे आणि इतर नागरिकांनी आरडाओरड केली. तेव्हा किडनॅपर यांनी मुलीला जागीच सोडून जयभवानी नगरकडे बुलटेवरून पलायन केले. दरम्यान, संबधित घटनेबाबत पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेचा पीएसआय भालेराव तपास करत आहेत. घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातारण पसरलं आहे. कारण, अपहरण करणाऱ्यांनी जेव्हा पळ काढला तेव्हा ते 'कट्टा काढ, कट्टा काढ', असे म्हणत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
अपहरण झालेल्या मुलाचा शोध लागला
दरम्यान, जालना जिल्ह्यातील ब्रम्हपुरी गावातून मुलाचं अपहरण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चिमुकल्या मुलाचं अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. विशेष म्हणजे चिमुकला मुलगा अपहरण करण्यात आलेल्या कारचा अपघात झाल्यामुळे सापडलाय. संभाजीनगर शहरातून ज्या गाडीतून मुलाचं अपहरण करण्यात आले होते, त्या गाडीचा जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळ अपघात झाला. त्यामुळे अपहरण प्रकरणातील आरोपी सापडले आहेत. अपघात झाल्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान, या चार आरोपींना संभाजीनगरकडे रवाना करण्यात आले असून मुलगाही सुखरुप आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.