
माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे. शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. हे पदाधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांपासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. पक्षातील अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांनी 'जय महाराष्ट्र' म्हणत पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी ३५ पदाधिकाऱ्यांसह पदाचा राजीनामा दिला आहे.
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे खदखद व्यक्त केली होती. दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही घेण्यात आला होता. तेव्हा कोणीही शिवसेना ठाकरे गट सोडणार नाही असा दावाही करण्यात आला होता. पक्षांतरामुळे हा दावा फोल ठरला आहे.
मंत्री अतुल सावे यांच्याकडून ठाकरे गटाला खिंडार पडल्याचे म्हटले जात आहे. आज (२१ जानेवारी) मुंबईत सर्व पदाधिकारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आणि सावे यांच्या नेतृत्त्वात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यात विश्वनाथ स्वामी यांच्यासह शिवा लुंगारे उपजिल्हाप्रमुख, प्रकाश अत्तरदे (माजी नगरसेवक),सुदाम देहाडे (विभागप्रमुख), नागनाथ स्वामी (विभागप्रमुख), मनोहर विखणरकर (गटप्रमुख), अजिंक्य देसाई (गटप्रमुख), पंतू जाधव (गटप्रमुख), बाबू स्वामी (गटप्रमुख) अशा ३५ जणांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.