Crime News : संभाजीनगरमध्ये गँगवॉर; घरावर दगडफेक, तरुणावर झाडल्या गोळ्या

Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात मोबाइल आणि मुलीच्या वादातून कुख्यात गुंडांमध्ये गँगवॉर उफाळला. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे.
Crime News : संभाजीनगरमध्ये गँगवॉर; घरावर दगडफेक,  तरुणावर झाडल्या गोळ्या
Sambhajinagar Mukundwadi Railway Station Area Gang War CrimeSaam Tv
Published On
Summary
  • मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात गँगवॉर

  • मोबाइल आणि मुलीच्या वादातून गोळीबार

  • पोलिसांची धडक कारवाई, ७ आरोपी अटकेत

  • पुढील तपास सुरू

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Mukundwadi Railway Station Area Gang War Crime छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात मोबाइल आणि मुलीच्या वादातून कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गँगवॉर उफाळून आला. सराईत गुन्हेगारांनी थेट गोळीबार करत एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यात काही टोळक्यांमध्ये शुल्लक कारणांवरून बाचाबाची झाली. या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. प्राथमिक अंदाजात हा वाद मुलीवरून आणि मोबाईलवरून झाल्याचे समोर आले आहे. या कुख्यात गुंडांनी गोळीबार करत एका तरुणाची हत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. शिवाय घरावर दगडफेक केली, तसेच मध्ये पडणाऱ्या नागरिकांनाही जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

Crime News : संभाजीनगरमध्ये गँगवॉर; घरावर दगडफेक,  तरुणावर झाडल्या गोळ्या
Western Railway : मुंबईकरांना दिलासा! विरार लोकल आणखी सुसाट धावणार, पश्चिम रेल्वेचं महत्त्वाचं काम पूर्ण, वाचा

या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, अंमलदार प्रकाश डोंगरे, शिवाजी शिंदे, संदीप बीडकर, अजय कांबळे, मुकुंदवाडीचे उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, नरसिंग पवार आदिनी यांनी बीड बायपासवरील म्हस्के पेट्रोल पंपामागे असलेले शुभम जाटचे घर गाठले. तेथे हल्लेखोर असल्याचे पोलीस पथकाला समजताच पथकाने घराला घेराव घातला. काही हल्लेखोरांनी पोलिसांना बघताच गच्चीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला.

Crime News : संभाजीनगरमध्ये गँगवॉर; घरावर दगडफेक,  तरुणावर झाडल्या गोळ्या
Akola : अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स, कोणत्या पक्षाचा महापौर होणार?

त्यात पोलिसांनी मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या उर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर उर्फ अतुल पवार यांना पकडले. मात्र या सगळ्यांना पकडताना पोलिसांच्या हातातून शुभम निसटला. तो रेल्वेरुळाच्या दिशेने पळून गेल्याचे त्याच्या आईने सांगितले. मात्र, ती खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने निरीक्षक भंडारे, अर्जुन राऊत यांनी गच्चीवरील पाण्याच्या टाक्या तपासण्यास सुरुवात केली. त्यात एका टाकीत शुभम लपून बसलेला. पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com