Chhatrapati Sambhajinagar News: भयंकर! सख्ख्या भावंडांकडून तरुणाची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

Chhatrapati Sambhajinagar: या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सध्या पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSaamtv

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime: वडिलांना दारु पाजल्याच्या रागातून दोन भावांनी एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात हा भयंकर प्रकार घडला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Latest News)

Chhatrapati Sambhajinagar
Jalna Crime News: पती-पत्नीच्या वादात सोन्यासारख्या लेकराचा गेला बळी; भयानक घटनेनं जालना हादरलं

याबाबत अधिक माहिती अशी की, माझ्या वडिलांना दारू का पाजली? म्हणत दोन भावंडांनी एकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील टाकळी येथे समोर आली आहे. करण बनकर व सुरज बनकर अशी हत्या करणाऱ्या आरोपी भावडांची नावे आहेत, तर बबन कुचे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Latest Marathi News)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सध्या पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. (Crime News)

Chhatrapati Sambhajinagar
Mumbai Crime News: मुंबईत चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार; मरीन ड्राईव्ह परिसरातील घटना

पती पत्नीच्या वादात चिमुकल्याने जीव गमावला...

जालना (Jalana) जिल्ह्यातूनही एक भयानक घटना समोर आली आहे. पतीसोबत वाद झाल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीला विष दिलं. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्देवी अंत झाल्याचे समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com