Sambhajinagar News: धक्कादायक! वृद्ध व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, तिघांना अटक; नेमकं कारण काय?

Sambhajinagar Crime News: संभाजीनगरमध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीला काही तरुणांनी पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये ही व्यक्ती गंभीररित्या भाजली असून सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sambhajinagar News: धक्कादायक! वृद्ध व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, नेमकं कारण काय?
Sambhajinagar Crime NewsSaam Tv

रामू ढाकणे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका वयोवृद्ध व्यक्तीला काही तरुणांनी पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये ही व्यक्ती गंभीररित्या भाजली असून सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संभाजीनगर शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

संभाजीनगर शहरातील शंभूनगर भागामध्ये ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी (Chhatrapati Sambhajinagar Police) तिघांना अटक केली आहे.

Sambhajinagar News: धक्कादायक! वृद्ध व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, नेमकं कारण काय?
Ulhasnagar Crime : कचरा टाकण्यावरून वाद; शेजाऱ्याकडून तरुणाला जबर मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील शहाणूर मिया दर्गा परिसरात असणाऱ्या त्रिशरण चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ३ तरुणांनी एका ५७ वर्षांच्या भिकारी व्यक्तीला जिवंत पेटवून दिले. या घटनेमध्ये महिपालसिंग रणधीरसिंग गौर हे ३५ टक्के भाजले असून त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Sambhajinagar News: धक्कादायक! वृद्ध व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, नेमकं कारण काय?
Dhule Crime : हॉटेलमध्ये दोघांवर जीवघेणा हल्ला; एकाची प्रकृती गंभीर, संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. आरोपी आदीलने समाधान आणि मुमताजला यांच्या मदतीने या व्यक्तीच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकले आणि 'माझ्या एरियात राहायचे नाही, इथून निघून जा.' असे म्हणत माचिसची पेटलेली काडी त्यांच्या अंगावर फेकली. पेट्रोल टाकल्यामुळे आग भडकली आणि यामध्ये महिपालसिंग गंभीररित्या भाजले. त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Sambhajinagar News: धक्कादायक! वृद्ध व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, नेमकं कारण काय?
Mumbai Crime: ३२७ कोटींचे ड्रग्ज जप्त, तस्करांची टोळी जाळ्यात अडकली, मास्टरमाइंड सलीम डोळा फरार

या प्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींना ताब्यात घेतले. आदिल शेख, कृष्णा शिंदे आणि शेख अयाज अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावं आहेत. या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींविरधात यापूर्वी विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.

Sambhajinagar News: धक्कादायक! वृद्ध व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, नेमकं कारण काय?
Ahmednagar Crime: जेवणावरुन वाद, मद्यधुंद टोळक्याचा हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला, तलवार अन् कोयत्याने वार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com