Chhatrapati Sambhajinagar: ह्रदयद्रावक! खेळता खेळता लिफ्टमध्ये गेला अन् दारात गळा अडकला; १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar: मन सुन्न करणारी घटना | खेळता खेळता लिफ्टमध्ये गेल्यानंतर अचानक लिफ्ट चालू झाली, मात्र चिमुकल्याला बाहेर पडता आले नाही....
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSaamtv

नवनित तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळता खेळता अचानक दरवाजा बंद होऊन 13 वर्षांच्या मुलाचा लिफ्टच्या गेटमध्ये अडकून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक दुर्घटना घडली आहे. साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी असे मृत मुलाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Raj Thackeray on Ashish Shelar: नाक्यावर सभा घेणारे, यांना कोण ओळखतं? राज ठाकरेंची शेलारांवर खरमरीत टीका

याबाबत अधिक माहिती अशी की, साकीबच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त त्याचे आई-वडील नुकतेच हैदराबादला (Hyderabad) गेले होते. त्यामुळे साकीबचा सांभाळ करण्यासाठी त्याला कटकट गेट भागातील हयात हॉस्पिटलजवळील इमारतीत राहणाऱ्या आजी-आजोबांकडे ठेवले होते.

रविवारी रात्री साडेनऊ वाजता साकीब तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना तो लिफ्टमध्ये गेला. त्यातच खेळता-खेळता लिफ्ट सुरू केली. परंतु, दरवाजा बंद झाला आणि बाहेर पाहताना त्याचा गळाच दरवाजात अडकला गेला. घटनेनंतर जोरात आवाज झाला. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhajinagar
Nagpur-Mumbai flight: आनंदाची बातमी! 20 मे पासून Air India ची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा, तिकिट दरही कमी होणार!

या दुर्देवी घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी यांना सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर साकीबचा मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात पाठवण्यात आला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. (Chhatrapati Sambhajinagar)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com