HSC Exam Scam: बारावीच्या निकाल तोंडावर असताना शिक्षण विभागात खळबळ; भौतिकशास्त्राच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर

भौतिकशास्त्राच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
HSC Exam Scam
HSC Exam ScamSaam Tv

HSC Exam Scam Update News: बारावीचा निकाल तोंडावर आल्यानंतरही संभाजीनगर बोर्ड मात्र वेगळ्याच पेचात सापडलंय. कारण बारावीच्या भौतिकशास्त्राच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्यानं पेपर विद्यार्थ्यांचा मात्र अक्षरं कुणाचं असा प्रश्न बोर्डाला पडलाय.

पेपर विद्यार्थ्यांचा पण लिहिला कोणी याचा शोध काही केल्या संभाजीनगरच्या बोर्डाला लागत नाही. तब्बल 372 उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीने लिहिल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय, मात्र तो लिहिणारा कोण हर मात्र समोर आलेच नाही. छत्रपती संभाजीनगर बोर्डातील बारावी परीक्षेच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच अक्षरात कोणी उत्तरे लिहिली याचा शोध पंधरवडा झाला तरी लागला नाही. (Latest Marathi News)

HSC Exam Scam
Navi Mumbai Water: नवी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; मोरबे धरणात इतकाच पाणीसाठा शिल्लक, पाणीकपात होणार?

संभाजीनगर बोर्डाच्या (Board Exam) बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचं चौकशीमध्ये आढळून आलंय. मात्र, एकाचवेळी ३७२ उत्तरपत्रिकेत कोणी आणि का लिहिले याचा उलगडा मात्र अद्यापर्यंत झाला नाही.

भौतिकशास्त्राच्या उत्तर पत्रिकेमध्ये वेगवेगळे अक्षरे आढळून आल्यानंतर बोर्डाने चौकशी सुरू केली. सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत ही उत्तरे लिहिली, त्या विद्यार्थ्यांची सुनावणी घेण्यात आली. मात्र त्या विद्यार्थ्यांनी ती अक्षरे आमची नाहीच असे सांगितल्यानंतर बोर्डाने परीक्षा केंद्र संचालकांची सुनावणी घेतली. (Maharashtra News)

HSC Exam Scam
Khopoli Accident News: भाजी खरेदीसाठी गेलेल्या पती-पत्नीची ताटातूट; भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

त्यानंतर हा प्रकार कुठे झाला, उत्तरपत्रिका जमा कधी केल्या, त्या कस्टोडियनकडे कधी पाठविल्या ही प्रश्न पर्यवेक्षक, कस्टोडियनलाही विचारण्यात आले. मात्र, कोण लिहिले याचं उत्तर अद्यापपर्यंत बोर्डाला मिळाले नसल्याचं सांगितले जातंय.

अत्यंत गोपनीय प्रक्रियेत एकाच वेळेस इतक्या उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिण्याचा बोर्डाच्या इतिहासातला पहिलाच प्रकार आहे. उत्तरपत्रिकेत एकाच अक्षरात लिहिलेली उत्तर हा त्या विद्यार्थ्यांच्या मार्क्स वाढवण्यासाठी होता की केवळ खोडसाळपणा होता आणि तो खोडसाळपणा का आणि कोणी केला हे शोधण्याचा आव्हान बोर्डासमोर आहे. येत्या 10 दिवसात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा अहवाल येत्या एक-दोन दिवसात समोर येईल असं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com