छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. जालना रोडवर एन ३ परिसरात गॅस टँकर उलटला आहे. होणाऱ्या गॅस गळतीमुळे जालना रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून जालना रोड वसंतराव नाईक चौक उडान पुलाजवळ एन-4 सिडको संपूर्ण परिसर बंद ठेवण्याचे आदेश जनार्धन विधाते अपर जिल्हादंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर फौजदारी यांनी दिला आहे.
गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आहे. सदर गॅस हवेमध्ये पसरलेला आहे. तसेच अजूनही काही घरांमध्ये पसरत आहे. अपघात स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक रहातात. गॅस गळतीमुळे येथे लोक जमा होत आहेत. त्यानुळे सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेता सिडको एन-3, एन-4, एन-5 परिसरातील सर्व शाळा व आस्थापना बंद ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
गळती झालेला गॅस ज्वलनशील आहे. तो हळहळू संपूर्ण परिसरात नागरिकांच्या घरामध्ये शिरला आहे. त्यामुळे सिडको परिसरात नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये. ज्वलनशील वस्तूंचा वापर टाळावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. गॅस गळती होत असताना ज्वलनशील वस्तूंचा वापर केल्यास आग लागण्यासाख्या घटना घडण्याची शक्यता असते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.