Sambhaji Nagar: संभाजीनगरात मोफत वस्तूंचे वाटप, पहाटेपासून महिलांची झुंबड उडाली, ३ KM पर्यंत रांग लागली; VIDEO

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजी नगरमध्ये गरीब घरातील कामगार महिलांसाठी अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महिलांना मोफत वस्तू वाटप करण्यात येत आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji NagarSaam Tv
Published On

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. संभाजी नगरमध्ये कामगार महिलांना मोफत वस्तू वाटप करण्यात येत आहे. यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सिडकोमध्ये संसार उपयोगी साहित्य मिळवण्यासाठी कामगार महिलांची मोठी गर्दी झालीय. इमारत बांधकाम कामगार कल्याण वाघाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य भांडी मिळतात, ती मिळवण्यासाठी नोंदणी आणि केवायसी करण्यासाठी पहाटेपासून महिला मोठ्या संख्येने रांगा लावून आहेत.

Sambhaji Nagar
Jalna Rain Today : तुफान पावसामुळे लग्नाचा मंडप उडाला; वऱ्हाडी मंडळींची तारांबळ, VIDEO

गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या वतीनं कामगार आणि गरीब महिलांना भांडीकुंडी आणि संसार पैकी साहित्य मिळावं यासाठी नोंदणी सुरू आहे त्या नोंदणीसाठी अक्षरशा महिलांची झुंबड उडाली आहे. छत्रपती संभाजी नगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील महिलांच्या नोंदणीसाठीची सुरुवात झाली आहे.

Sambhaji Nagar
Sambhaji Brigade : PM मोदींच्या मुंंबई दौऱ्यात आंदोलन करणार, संभाजी ब्रिगेडचा इशारा

कामगार कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी ही नोंदणी करीत आहेत. सुरुवातीला पाच हजार किट त्या त्या ओर्डामध्ये दिली जाणार आहेत, त्याची सध्या नोंदणी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास 40 हजार किट कुटुंबांना दिल्या जाणार आहेत त्याचीही नोंदणी सुरू आहे नोंदणीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये कुटुंबातील सदस्य रांगेत उभे आहेत. एका महिलेला चाळीस ते पन्नास हजार रुपयाची संसार उपयोगी साहित्य भांडी कीट मिळणार आहे.

कामगारांच्या कुटुंबाला हातभार लागावा, यासाठी या वस्तू महिलांना मोफत दिल्या दिल्या जातात. यामुळे त्यांना मदत होते. जवळपास ४० हजार गोष्टींचे वाटप केले जाणार आहेत. यासाठी ३ किलोमीटर लांबपर्यंत महिलांच्या रांगा लागल्या आहेत. याचे व्हिडिओदेखील समोर आले आहेत.

Sambhaji Nagar
LIC Jeevan Shanti Scheme: मस्तच! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा; LIC जीवन शांती पॉलिसी आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com