Chhagan Bhujbal : मी ज्या पक्षात होतो तेथे मान मिळत होता; छगन भुजबळांचं विधान

Chhagan Bhujbal On NCP: मी जीव धोक्यात घालून लढत होतो. आत्ताचा लढा एक हाती लढलो त्यात आमदारांचे घर जाळले जात आहे. त्यांना वाटत असेल आता लढव्या काय करायचे असे असेल, असं विधान छगन भुजबळ यांनी केलंय.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal On NCPSaam Tv
Published On

सुप्रिया ताई बोलले ते खरे आहे, त्यांच्या बाजूला माजी खुर्ची असायची. मी ज्या पक्षात होतो त्यात मला मान मिळत होता, असं विधान नाराज छगन भुजबळांनी केलंय. भुजबळ यांच्या या विधानामुळे ते वेगळा निर्णय घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आपल्याला मंत्रिपद देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आग्रही होते मात्र तरीही डावलण्यात का आलं असा सवाल भुजबळ यांनी केलाय. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हे विधान करत त्यांनी अजित पवार गटाला आरोपींची पिंजऱ्यात टाकलंय. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. आपल्याला संधी मिळाली नसल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलीय. नाराजी व्यक्त करताना आपल्याला पक्षात वागणूक योग्य प्रकारे मिळत नसल्याचा आरोपही माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय. मंत्रिपद मिळाले नसल्याने छगन भुजबळ वेगळा विचार करतील अशी शक्यता आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : आधी लोकसभा, राज्यसभा हुकली, आता मंत्रिपद नाकारले, भुजबळ मोठा निर्णय घेणार!

महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. मात्र अनेकांना डच्चू मिळाल्याने तिन्ही पक्षात नाराजीचाही विस्तार झालाय. महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार गटाला 11 मंत्रिपदे मिळाली. यामुळे मात्र आमदार छगन भुजबळांना डच्चू देण्यात आला. मंत्रिपद मिळालं नसल्यानं भुजबळ अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. आपल्याला पक्षात मान मिळत नसल्याचा आरोपदेखील छगन भुजबळ यांनी केलाय.

छगन भुजबळ यांना मंत्रिपदे देण्यात आले नाही त्यावरून सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार गटावर टीका केली होती. शरद पवार गटात असताना छगन भुजबळ यांना योग्य तो आदर दिला जात होता असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावरून बोलतान भुजबळ म्हणाले सुप्रिया ताई बोलले ते खरे आहे त्यांच्या बाजूला माजी खुर्ची असायची. मी ज्या पक्षात होतो त्यात मला मान मिळत होता. मी जीव धोक्यात घालून लढत होतो. आत्ताचा लढा एक हाती लढलो. त्यात आमदारांचे घर जाळले जात होते. त्यांना वाटत असेल आता लढव्या काय करायचे असे असेल.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : आधी लोकसभा, राज्यसभा हुकली, आता मंत्रिपद नाकारले, भुजबळ मोठा निर्णय घेणार!

निर्णय फक्त तिघांमध्ये होतो

मंत्रिपदाबाबत आपण नाराज असल्याचं सांगताना छगन भुजबळ म्हणाले, ,नाशिकला आपल्याला कार्यकर्त्यांनी सांगितले आहे, आपण जो निर्णय घेऊ तो मान्य असेल. आपण मंत्रिपद मिळालं म्हणून नाराज नाही,तर पक्षात मिळत अपल्याला चांगली वागणूक मिळत नाहीये. पक्षात फक्त तीन लोकांमध्ये म्हणजेच अजित पवार आणि पटेल, सुनील तटकरे यांच्यात निर्णय होतोय. विशेष म्हणजे स्वतः फडणवीस बावनकुळे यांनी मंत्री मंडळात नाव घेण्यासाठी आग्रह होते, असंही छगन भुजबळ म्हणालेत. काही लोकांना शब्द दिला म्हणून माझ्यावर अन्याय झाल्याचंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com