Chandrashekhar Bawankule : पाचही जागा आम्हीच जिंकणार; मतदानाचा हक्क बजावत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

Nagpur Constituency : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी आपल्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय. तसेच महायुतीचे उमेदवार 51% च्यावर मत घेऊन निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam tv

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी ग्रामपंचायत येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. बावनकुळेंनी सकाळी आपल्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय. तसेच महायुतीचे उमेदवार 51% च्यावर मत घेऊन निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Chandrashekhar Bawankule
BJP Candidate List: भाजप उमेदवारांची ११ वी यादी जाहीर! महाराष्ट्रातील जागांची घोषणा नाहीचं; सातारा- रत्नागिरीबाबत सस्पेन्स कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्या संकल्पासाठी आज मतदान होत आहे. मी आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या टप्प्यातील आमच्या पाचही जागा आम्ही जिंकणार आहोत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

पूर्व विदर्भातील पाचही जागा 51% च्यावर मत घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. मोदींना साथ देण्याकरता जनता ही उत्साही आहे. मला वाटतं की मतदारांनी प्रचंड मतदान करावं. मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी, ही देशाची निवडणूक आहे. देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे, असंही बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय.

नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क

नागपूरमध्ये महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी देखी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपूरच्या टाऊन हॉलमध्ये त्यांनी मतदाना केलंय. तसेच अन्य सर्व नागरिकांना देखील जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील नागपूर लोकसभेची जागा चांगलीच चर्चेत आहे. भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सलग तिसऱ्यांदा तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसने विकास ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे, त्यामुळे आज कोण विजयाचा शिखर गाठणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

Chandrashekhar Bawankule
Nitin Gadkari News: उद्धव ठाकरेंकडून दोनदा ऑफर, नितीन गडकरींनी एका वाक्यातच विषय संपवला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com