Chandrapur: १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेची तयारी करताना खाली पडला; आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण

School Boy Dies of Cardiac Arrest: चंद्रपूरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चंद्रपूरच्या ब्रम्हपूरीमध्ये ही घटना घडली. सकाळी शाळेची तयारी करत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Chandrapur: १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेची तयारी करताना खाली पडला; आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण
School Boy Dies of Cardiac ArrestSaam Tv
Published On

Summary -

  • चंद्रपूरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू

  • शाळेची तयारी करताना अचानक खाली कोसळला

  • हृदयविकाराच्या झटक्याने चिमुकल्याचा मृत्यू

  • कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये १० वर्षांच्या शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाळेची तयारी करत असताना हा मुलगा चक्कर येऊन खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीच्या देलनवाडी येथे ही घटना घडली. आईच्या डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू झाला त्यामुळे हळहळ व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान सत्यपाल आत्राम असं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो चौथीमध्ये शिकत होता. १० वर्षांचा ईशान नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत होता. त्याचवेळी अचानक त्याचा मृत्यू झाला. शाळेची तयार करत असताना तो खाली कोसळला. ईशान बेशुद्ध पडल्याचे वाटल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी तात्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषीत केले.

Chandrapur: १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेची तयारी करताना खाली पडला; आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण
Shocking News: कुत्र्यामुळे लग्न मोडलं! मंडपातच नवरा-नवरीचे नातेवाईक आपापसात भिडले; एकमेकांना धूधू धुतलं, ४ जण जखमी

ईशानच्या घरच्यांनी सांगितले की, ईशान आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी उठला होता. आंघोळ आटोपून तो शाळेचा गणवेश परिधान करून तयारी करत असतानाच सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो कोसळला. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

Chandrapur: १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेची तयारी करताना खाली पडला; आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण
Shocking News: लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकला, पाहुण्याचा तडफडून मृत्यू

डॉक्टरांनी ईशानचा मृत्यू झाल्याचे घोषित करताच आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. इतक्या कमी वयात हृदयविकाराचा झटका आल्याने सारेच अवाक झाले आहेत. आपल्या लेकराचा डोळयासमोर असा मृत्यू झाल्याचे पाहून ईशानच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. आजकालच्या लाइफस्टाइलमुळे कमी वयातच मुलांना हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.

Chandrapur: १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेची तयारी करताना खाली पडला; आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण
Shocking crime news: कुऱ्हाडीने पत्नीवर हल्ला, कापलेला पाय घेऊन पती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, नेमकं घडलं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com