कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

Farmer Sells Kidney: चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आलीय. एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी त्याची किडनी विकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सावकारानेच शेतक-याला किडनी विकण्याचा सल्ला दिला होता.
FARMER SELLS KIDNEY TO REPAY LOAN IN CHANDRAPUR
FARMER SELLS KIDNEY TO REPAY LOAN IN CHANDRAPURSaam Tv
Published On

अस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे शेतकरी हतबल असतानाच आता सावकारही बळीराजाला नडत आहेत. चंद्रपूरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला.

कर्ज फेडण्यासाठी विकली किडनी

रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकाराकडून 1 लाखांचं कर्ज घेतलं

सावकाराकडून दिवसाला 10 हजार रुपये व्याजाने वसुली

1 लाखांचं कर्ज 74 लाखांवर केलं

कर्ज फेडण्यासाठी जमीन, ट्रॅक्टर घरातील सामान विकलं

कर्ज न फिटल्याने सावकाराकडून किडनी विकण्याचा सल्ला

रोशन कुडेने 8 लाखांत किडनी विकली

एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकाता येथे नेले होते. तिथं ऑपरेशनंतर कुडे यांनी आठ लाखाला किडनी विकली. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिलंय.

तक्रार करुनही कारवाई होत नसल्यानं मंत्रालयात संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करून मोकळा होतो, असा इशारा उद्वीग्न होत कुडे यांनी दिलाय. बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी कायदा असूनही ग्रामीण भागात बळीराजाला लुटलं जातंय. यंत्रणेचीच साथ असल्यामुळेच सावकार गब्बर होत चाललेत. कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात आता या सावकारांवर काय कारवाई होतेय ? ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com