भारतीय रेल्वेने १७० गौरवशाली वर्षे पूर्ण केली. दिनांक १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेली आशियातील आणि भारतातील पहिली ट्रेन बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून रवाना झाली. जसजशी वर्षे निघून गेली, तसतशी पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली आणि उत्तरेकडे दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद तसेच पूर्वेला नागपूरपासून व दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत त्याच्या सीमांचा विस्तार केला.
दिनांक ५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या ५ विभागांसह मध्य रेल्वेचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२१९ मार्ग किमीपेक्षा जास्त नेटवर्क आहे. मध्य रेल्वे या राज्यांना ४७१ स्टेशन्सद्वारे सेवा देते.
दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी, वंदे भारत एक्सप्रेसला माननीय पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवला, जेथून आशियातील पहिली ट्रेन निघाली होती. हा वारसा आणि विकासाचा परिपूर्ण संगम आहे. एप्रिल १८५३ मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील सर्वात आधुनिक ट्रेनपर्यंत, गेल्या १७० वर्षांमध्ये रेल्वेने आपले नेटवर्क मोठ्या क्षेत्रापर्यंत वाढवले आहे.
पंजाब मेल सारख्या काही जुन्या गाड्यांसह ती निश्चितच खूप पुढे गेली आहे, ती १०० वर्षांनंतरही प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहेत. मध्य रेल्वेही अनेक यश मिळवून आघाडीवर आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय कामगिरी आहेत: पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जन शताब्दी एक्सप्रेस, पहिलीत तेजस एक्सप्रेस ही काही नावे आहेत.
दि. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी तत्कालीन बॉम्बे व्हीटी ( आताचे छत्रपती शिवाजी महाराज) आणि कुर्ला हार्बर दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सेवा चालवून रेल्वेच्या विद्युतीकरणाचा पाया घातला गेला आणि मुंबईच्या उपनगरी सेवा आज मुंबई शहराची जीवनरेखा बनल्या आहेत.
आज, मध्य रेल्वेने १००% विद्युतीकरण गाठले आहे आणि उपनगरीय नेटवर्क देखील सातत्याने वाढले आहे. सध्या मध्य रेल्वेकडे पाच उपनगरीय कॉरिडॉर आहेत. तीन डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू ९ डब्यांच्या, १२ डब्यांच्या आणि १५ डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी वातानुकूलित उपनगरीय सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत.
निर्मितीच्या वेळचे मूळ लोडिंग जे १६.५८ दशलक्ष टन होते, ते आता २०२२-२३ मध्ये ८१.८८ दशलक्ष टन झाले आहे जे आतापर्यंतचे सर्वोत्तम आहे. याशिवाय नवीन रेल्वे मार्ग बांधणे, दुहेरीकरण, पूल बांधणे, नवीन स्थानके बांधणे आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.
नेरळ - माथेरान लाइट रेल्वेनेही ११६ वर्षे पूर्ण केली आहेत. नेरळ - माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाईन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून, पावसाळ्यात हा रेल्वेमार्ग बंद असायचा पण वेळेवर पुन्हा सुरू करण्यासाठी एक सेवा चालते. तथापि, अमन लॉज आणि माथेरान दरम्यान शटल सेवा दि. २९.९.२०२२ पासून अगदी पावसाळ्यातही चालण्यासाठीसुरू करण्यात आली.
नेरळ-माथेरान रेल्वेला २००५ मध्ये एकदा आणि पुन्हा २०१९ मध्ये अतिवृष्टीचा फटका बसला. मध्य रेल्वेने या विभागात ट्रॅक आणि राइड सुधारण्यासाठी अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत. २२.१०.२०२२ पासून नेरळ - माथेरान एनजी लाईनवरील दोन सेवा पुन्हा सुरू झाल्या. आता, अलीकडेच २०२३ पासून वातानुकूलित सलून सेवा देखील सुरू केल्या आहेत ज्या विनंतीनुसार मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ यांच्याकडे बुक केल्या जाऊ शकतात.
सन १८५३ पासून आजपर्यंत, मध्य रेल्वे नेहमीच सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यात अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि नेहमीच प्रयत्नशील आहे आणि आपल्या आदरणीय प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास देण्यासाठी कटिबद्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.