रत्नागिरी : मध्य रेल्वेने मुंबई विभागात (Upgradation Work over Central Railway route) ठाणे आणि दिवा स्थानकदरम्यान ७२ तासांचा मेगा ब्लॉक (72 hrs railway mega block) घोषित करण्यात आला आहे. यामुळं कोकण रेल्वे (Kokan Railway) मार्गांवरील अनेक गाड्याचे वेळापत्रक (Kokan Railway Latest Updates) पाच, सहा आणि सात फेब्रुवारीस विस्कळीत झाले आहे. या मार्गावरील २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
याबाबत कोकण रेल्वेकडून (Kokan Railway) अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात ठाणे ते दिवा या स्थानका दरम्यान ५, ६ आणि ७ फेब्रुवारी दरम्यान मेगा ब्लॉक घोषित केल्याचे पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान या मेगा ब्लॉकमुळं (mega block) कोकण रेल्वेने नियाेजीत वेळापत्रक माेठा बदल केला आहे.
या कालावधीत जवळपास २० गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने त्याची माहिती ट्विट करुन जाहीर केली आहे. प्रवाशांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.