Indian Sugar Industry News: साखर उत्पादकांसाठी गोड बातमी! इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारकडून परवानगी

Ethanol Production From Indian Sugar Industries: साखर उत्पादकांसाठी गोड बातमी आहे. केंद्र सरकारने मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे.
Indian Sugar Industry News: Central Govt. Approves Ethanol Production From Sugarcane Manure
Indian Sugar Industry News: Central Govt. Approves Ethanol Production From Sugarcane ManureSaam Tv

प्रमोद जगताप साम टीव्ही, नवी दिल्ली

साखर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ६ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने (Central Govt) बी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीला बंदी (Ethanol Production From Sugarcane) घातली होती. पण सरकारनं आता ही बंदी उठवली आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं (Ethanol Production) तब्बल ३८ कोटी लिटरची निर्मिती वाढणार असल्याची माहिती मिळतेय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं इथेनॉल निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

Indian Sugar Industry News: Central Govt. Approves Ethanol Production From Sugarcane Manure
Sugarcane Worker Issue : ऊसतोड कामगारांच्या दरवाढीसाठी शरद पवार, पंकजा मुंडे करणार चर्चा; ४ जानेवारीला शिर्डीत होणार बैठक

सरकारने देशांतर्गत साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसंच साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा म्हणून हा निर्णय घेतला (Sugarcane News Update) होता. साखर नियंत्रण कायदा १९६६ च्या कलम ४ आणि ५ नुसार इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती. अन्न पुरवठा मंत्रालयाने ७ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या आदेशात 'साखरेचा रस आणि सिरप' पासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील १५० इथेनॉल प्रकल्पांना थेट फटका बसला होता. केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील दिडशे साखर (Ethanol Production Update) कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते. या प्रकल्पामधून यावर्षी तयार होणाऱ्या सुमारे आठशे कोटी लिटर इथेनॉलचे पेट्रोलियम कंपन्यांची करार देखील झाले होते. केंद्र सरकारने निर्मितीवर बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला होता.

Indian Sugar Industry News: Central Govt. Approves Ethanol Production From Sugarcane Manure
FRP For Sugarcane : साखर कारखानदारांना दर द्यायला लावू पण... राजू शेट्टींना समजावून सांगू असं का म्हणाले हसन मुश्रीफ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com