Palghar : मोठी बातमी! सातपाटी मासेमारी बंदर विकसित करण्यासाठी केंद्राकडून 'इतक्या' कोटींच्या निधीला मंजुरी

पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
File Photo
File Photo Saam Tv
Published On

Palghar News : पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन केंद्र शासनाने जिल्ह्यातील सातपाटी मासेमारी बंदराच्या विकासासाठी मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत 150 कोटी रुपयांच्या निधिस मंजुरी दिली आहे. (Latest Marathi News)

File Photo
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येण्यासाठी सकारात्मक; राष्ट्रवादीच्या 'त्या' निर्णयाकडे लक्ष

केंद्रीय मंजुरी आणि संनियंत्रण समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या १५व्या बैठकीत ही मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. सातपाटी मासेमारी बंदर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.

पालघर (Palghar) जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी सबंधित मंत्रालय व विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष जावून या प्रस्तावाच्या स्थितीबाबत माहिती घेवून या प्रस्तावास गती आणण्याचे सातत्यपूर्ण कार्य गावित यांनी केले आहे. परिणाम स्वरूप या प्रस्तावास मान्यता मिळून निधीही मंजूर झाला आहे. या मंजुरीबद्दल आनंद व समाधान व्यक्त करत श्री गावित यांनी सातपाटी मासेमारी बंदराच्या पायाभूत विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला .

File Photo
Mumbai Fire News : मुंबईच्या अंधेरीतील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी

केंद्रीय मंत्री व अधिकाऱ्यांचे मानले आभार

सातपाटी मासेमारी बंदर विकास प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देणारे केंद्रीय मत्स्य, पशु व दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांचे खा. गावित यांनी आभार मानले आहे.

केंद्रीय मंत्री रूपाला यांनी या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता करून देण्यास वेळोवेळी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधितांना तशा सूचना केल्या. यासोबतच केंद्रीय मत्स्य, पशु व दुग्ध मंत्रालयाचे सहसचिव सागर मेहरा आणि महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाचे आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांचेही खा. गावित यांनी आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com