रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा...

रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवात ब्रिटिश काळापासूनची पोलीस मानवंदनेची परंपरा आजही कायम आहे.
रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा...
रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा...राजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: रोह्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज सकाळी प्रारंभ झाला. दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा होतो. पहाटे धावीर महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.  ब्रिटिश काळापासून धावीर महाराजांना पोलीस मानवंदना देण्याची परंपरा आजही कायम आहे. (Celebration of Shri Dhavir Maharaj, the village deity of Rohya in a traditional way)

हे देखील पहा -

पालखी सोहळ्यानिमित्त मंदिर आणि परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. रोहे शहरात आज उत्साहाचे वातावरण आहे. 16 तास हा पालखी सोहळा चालणार आहे. आजच्या सोहळ्याला हजारो रोहेकरांसह पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी धावीर महाराजांचे दर्शन घेतले. विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती. दोन वर्षे कोरोना काळ असल्याने श्री धावीर महाराज पालखी सोहळा हा साधेपणाने साजरा होत होता. दोन वर्षे धावीर महाराज पालखी ही घरोघरी आली नव्हती. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी रोहेकरांच्या घरोघरी धावीर महाराज यांची पालखी येणार असली तरी आरती करण्यास परवानगी नाही.

रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा...
"राज्य सरकारने किन्नरांना आश्रम उभारून द्यावे"- कल्याण-डोंबिवली मधील तृतीयपंथीयांची मागणी

अक्षदा, फुले उधळून धावीर महाराजांचे स्वागत करायचे आहे. परंपरेने धावीर महाराज यांची बंधू भेट घेतली जाणार आहे. पालखी सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजविले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून हा पालखी सोहळा सुरू झाला आहे. श्री धावीर महाराज यांची पालखी घरी येणार असल्याने रोहेकारांच्या आनंदाला उधाण आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com