नागपूरात सीबीआयचं सर्च ॲापरेशन, कोराडी परिसरातील लॅवरेज ग्रीन सोसायटीत धाड

ही १२ ठिकाण माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याशी संबंधित सीए आणि शेअर ट्रेडिंगशी संबंधीत व्यक्तींची असल्याची माहिती समोर आली आहे.
CBI search operation in Nagpur
CBI search operation in NagpurSaam Tv
Published On

नागपूर : सीबीआयने (CBI)आज सकाळी सात वाजतापासून शहरातील १२ ठिकाणी छापेमारी करून सर्च ऑपरेशन सुरू केले. ही १२ ठिकाण माजी गृहमंत्री अनिल देखमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित सीए आणि शेअर ट्रेडिंगशी संबंधीत व्यक्तींची असल्याची माहिती समोर आली आहे. कोराडी परिसरासह विविध भागात आज सकाळी ७ वाजतापासून हे छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात ७ कोटींचा व्यवहार झाला होता. आधी हा व्यवहार ४ कोटींचा असल्याची चर्चा होती. तर, आता ती रोकड सात कोटी असल्याची माहिती पुढे आल्यामुळे ही छापेमारी करण्यात आली.

हे देखील पहा -

सीबीआयची टीम दोन वाहनांनी कोराडी मार्गावरील लॅवरेज ग्रीन सोसायटीमध्ये आली होती. देशमुखांचे सीए विशाल खटवानी याच्या निवास तसेच कार्यालयात सीबीआयच्या पथकाने धाड टाकली.तसेच सीबीआयच्या पथकाने काही कागदपत्रांची तपासणी करून काही कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. दरम्यान या तपासणीत काही डिजिटल पुरावे देखील सीबीआयच्या हाती लागले असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ७ वाजतापासून ही कारवाई सुरू होती.

CBI search operation in Nagpur
Goa Assembly Elections: प्रत्येक राज्यात निवडणूक लढवणार - आदित्य ठाकरे

दरम्यान, १०० कोटींची खंडणी वसूल प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना कारागृहात जावे लागले. त्यानंतर देशमुख यांना ईडी, आयकर विभाग व सीबीआयच्या चौकशीला समोर जावे लागत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com