Goa Assembly Elections: प्रत्येक राज्यात निवडणूक लढवणार - आदित्य ठाकरे

शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेचे प्रमुख तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे कालपासून गोवा दौऱ्यावर आहेत. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी गोव्यातील वास्को, पेडणे अश्या अनेक भागात प्रचार केला.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

गोवा: शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेचे प्रमुख तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे कालपासून गोवा दौऱ्यावर आहेत. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी गोव्यातील वास्को, पेडणे अश्या अनेक भागात प्रचार केला. तसेच आजही ते प्रचारासाठी अनेक भागात जाणार आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी संवाद साधण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊतही (Sanjay Raut) उपस्थित होते.

Aaditya Thackeray
सांगली: घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश! (पहा Video)

जाहीरनामा ही औपचारिकता आहे;

आदित्य ठाकरे म्हणाले, "गोवा विधानसभेसाठी शिवसेनेचे अकरा उमेदवार उभे आहेत. गोव्यातील वचन नाम्याचे उदघाट्न आणि प्रकाशन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेचे चिन्ह आता घरोघरी पोहचत आहे. आम्ही अकरा जागांवर लढत आहोत. गोव्यात ही निवडणूक लढताना गोवा आणि प्रत्येक राज्यात लोकसभा विधान सभा निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्र बाहेर शिवसेना गरज जाणवत आहे. जाहीरनामा ही औपचारिकता आहे."

हे देखील पहा-

गोवा आणि प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढणार;

शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना म्हणून गोव्यात निवडणूक लढवत असताना, आम्ही मागच्या वेळी देखील निवडणूक लढवली यावेळी देखील लढवत आहोत. पण इथून पुढे गोवा आणि प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर आम्ही निवडणूक लढणार. मग ती ग्रामपंचायत असेल, लोकसभा असेल विधानसभा असेल, पंचायत असा सर्व निवडणूक आम्ही लढत राहणार कारण महाराष्ट्राच्या बाहेर देखील शिवसेनेची गरज जाणवायला लागली आहे. त्याचबरोबर त्यांना शिवसेना म्हणजे स्थनिक भूमिपुत्रांना न्याय देणारे पक्ष माहित आहे. आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार. गोव्याच्या प्रत्येक भागात शाखा असणार. केंद्रात बहुमत आणि इथे दहा वर्ष सट्टा असून पाण्याचा प्रश्न आहे.

पाठीत खंजीर खुपसला;

गेल्या ५ वर्षात ज्या पद्धतीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. केवळ आमचेच नाही सर्व NDA मधील मित्र पक्ष सोडत गेले. अश्या काळात आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार. गोव्याच्या प्रत्येक भागात शाखा असणार असही आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com