Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे पाटलांवर नांदेडनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल; रॅली काढल्यामुळे पोलिसांची कारवाई 

Case Filled Against Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे पाटील यांनी बीड शहरासह आणि जिल्ह्यातील उमरद खालसा, म्हाळस जवळा, गुंदा वड गाव, पिंपळनेर, लोणी शहाजानपूर यासह विविध गावांमध्ये बैठका घेतल्या. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Manoj jarange Patil Case Filled in Beed
Manoj jarange Patil Case Filled in BeedSaam Tv
Published On

Case Registered Against Manoj Jarange Patil In Beed:

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. बीड जिल्ह्याधिकाऱ्यांचा आदेश मोडणं जरांगे पाटील यांना महागात पडलंय. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी मनाई आदेश जारी केले होते. जिल्हाधिकाऱ्याची रॅली काढण्यास आणि बैठक करण्यास परवानगी नव्हती. तरीही मनोज जरांगे पाटील यांनी काल बीड जिल्ह्यात बैठक आणि रॅली काढली होती. याआधी नांदेडमघ्ये सुद्धा त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Latest News)

मनोज जरांगे पाटील यांनी बीड शहरासह आणि जिल्ह्यातील उमरद खालसा, म्हाळस जवळा, गुंदा वडगाव, पिंपळनेर, लोणी शहाजानपूर यासह विविध गावांमध्ये बैठका घेतल्या. बैठकांनंतर जाहीर भाषणे केली. तर परवानगी नसतांनाही रॅली काढल्या. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्यासह पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे यांच्यासह १५० ते २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी मनोज जरांगे यांच्यावर रस्ता रोको केल्याप्रकरणी शिरूर कासार आणि अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj jarange Patil Case Filled in Beed
Nitesh Rane On Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटील यांना आता मराठा समाज गांभीर्याने घेत नाही : नितेश राणे

नांदेडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आहे. मनोज जरांगे यांच्याविरोधात सोमवारी रात्री उशिरा नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांची नांदेड मधील एका मंगल कार्यालयात सभा झाली होती. मात्र या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. याशिवाय नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ५ तारखेपर्यंत जिल्ह्यात जमाव बंदी आहे. तसेच आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करण्यास बंदी घातली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com