Maharashtra Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाज, कांदा उत्पादकांना दिलासा; शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

Cabinet Meeting: आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळात कांदा उत्पादकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 राज्य मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय
राज्य मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णयSaam Tv

Maharashtra Cabinet Meeting:

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळात कांदा उत्पादकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळात महसूल सचिवांना कुणबी प्रमाणपत्र संबंधित सात दिवसात रिपोर्ट देण्याच्या देण्यात आल्या आहेत.

कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा रस्त्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. नाराज झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. आज मंत्रिमंडळाची बैठक चालू असताना शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला.

 राज्य मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय
Eknath Khadse on Onion Export News : गोंधळाची स्थिती! कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा खडसेंनी मांडली

प्रति क्विंटल 350 रुपये प्रमाणे 200 क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ३ लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज केल्याने त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय

  • मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत

  • मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव

  • राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प

  • आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार.

  • एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज

  • केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट

  • मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात

 राज्य मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय
Special Report : महाराष्ट्रात कांदा प्रश्न का पेटलाय?, लिलाव का पाडताहेत बंद?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com