Cabinet Meeting : राज्य सरकारचा मोठा निर्णय! देशी गायींना 'राज्यमाता - गोमाता' दर्जाची घोषणा

Rajyamata Gomata : विधानसभेच्या तोंडावर सोमवारी एक कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! देशी गायींना 'राज्यमाता - गोमाता' दर्जाची घोषणा
Cabinet MeetingSaam tv
Published On

गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे हिंदू धर्मात गायीची पुजा देखील केली जाते. अशात राज्य सरकारने गायीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. देशी गायी राज्यमाता असल्याचं जाहीर केलं आहे. विधानसभेच्या तोंडावर सोमवारी एक कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! देशी गायींना 'राज्यमाता - गोमाता' दर्जाची घोषणा
Modi 3 Cabinet Portfolio: एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप; नितीन गडकरीसह इतर कोणत्या नेत्याला कोणतं मिळालं खातं? जाणून घ्या संपूर्ण मंत्रिमंडळ

देशी गायींना वैदिक काळापासून माणवाच्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे. गायींच्या दुधाचा आपल्याला बराच फायदा होतो. पंचगव्य उपचार, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती, शेण गोमूत्र यांच्या सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचे स्थान यामुळे देशी गायीबाबत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

कॅबिनेट बैठकीतील अन्य महत्वाचे निर्णय

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू

२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा खुशखबर देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये सेवानिवृत्ती उपदान १४ लाखांवरुन थेट २० लाख रुपये इतका करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु असतानाच कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तीन वर्षांमध्ये सरकारी तिजोरीवर १०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! देशी गायींना 'राज्यमाता - गोमाता' दर्जाची घोषणा
Cabinet Seven Big Decisions : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! केंद्राकडून कृषी क्षेत्राला मोठं गिफ्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com