EV Buses Ticket Price: 'लाल'परीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तिकीटाचे दर होणार कमी?

Buses Ticket Price Down: नव्या बसच्या तिकीटांच्या किंमती कमी असतील असं म्हटलं जातंय.
EV Buses Ticket Price
EV Buses Ticket PriceSaam TV
Published On

E-Bus Ticket:

बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने इलेक्ट्रिक बस (E-Buses) दाखल होणार आहेत. या नव्या बसच्या तिकीटांच्या किंमती कमी असतील असं म्हटलं जातंय. एसटी महामंडळाकडून याबाबत हलचाली सुरू करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

समितीची स्थापना

ई बसच्या तिकीटांच्या किंमतींबाबत राज्य सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तिकीटांच्या दरांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता शासनाने ई-बससेवा सुरू केली आहे. यामध्ये आणखीन नव्या ई बसची सेवा उपब्ध होणार आहे.

EV Buses Ticket Price
Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूमध्ये भीषण अपघात, बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींसह वाहनांमधील धूराच्या समस्यांमुळे नागरिकांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतोय. खोकला, त्वचेचे आजार अशा विविध समस्या जाणवत आहेत. जास्तीत जास्त ई-बस सेवेत आल्यास समस्या आटोक्यात आणण्यास मदत होईल.

मुंबई आणि नवी मुंबईमध्ये काही प्रमाणात ई-बससेवा सुरू झाली आहे. यासह काही ठिकाणी एसीबस देखील उपलब्ध आहे. प्रशासनाने ई-बसच्या तिकीटांच्या किंमती कमी केल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

विविध गोष्टींवर आकारण्यात येणाऱ्या टॅक्समुळे राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. भाजीपाल्यासह अन्नधान्याच्या किंमतीत वाढ होतेय. अशा स्थितीत नागरिकांना बसमधील तिकीटांचे दर कमी झाल्याने दिलासा मिळेल.

EV Buses Ticket Price
Pimpri Chinchwad Crime News: भंगार खरेदीवरून किरकोळ वाद, जंगलात नेलं अन्...; पिंपरी-चिंचवडमधील थरारक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com