Firecrackers News: कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत फोडले फटाके; मुंबई पोलिसांकडून ८०६ जणांवर कारवाई

HC Order On Bursting Firecrackers: पोलिसांची फोन लाईन सतत व्यस्त असल्याने अनेकांना कॉल लावण्यात अडचणीही आल्या. फटाक्यांपासून त्रास होत असल्याने अनेकांनी ट्विटरवर देखील तक्रारी केल्या.
Firecrackers News
Firecrackers NewsSaam TV
Published On

Action Against 806 Persons:

मुंबईतील प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. दिवाळीत सर्वचजण फटाके फोडतात. त्याने प्रदूषण आणखी वाढते. प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा ठरवून दिली होती. मात्र मुंबईकरांनी मर्यादा न पाळत फटाके फोडल्याने आतापर्यंत हजारो तक्रारी आल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Firecrackers News
Gondia Crime News: दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; गोंदियामधील थरारक घटना

वेळ आणि मर्यादेचं उल्लंघन करत फटाके वाजवल्याने मुंबई पोलिसांकडे हजारो तक्रारी आल्यात. गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षावर तब्बल आठ हजार कॉल्स आले होते. पोलिसांची फोन लाईन सतत व्यस्त असल्याने अनेकांना कॉल लावण्यात अडचणीही आल्या. फटाक्यांपासून त्रास होत असल्याने अनेकांनी ट्विटरवर देखील तक्रारी केल्या.

८०६ जणांविरुद्ध कारवाई

आत्तापर्यंत फटाके आणि वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केली ८०६ जणांविरुद्ध कारवाई केलीये. तर एकूण ७८४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ८०६ जणांपैकी ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीये.

वेळेचं बंधन न पाळणाऱ्यांवर तसेच पर्यावरण पूरक फटाक्यांऐवजी दुसरे फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. मुंबईतील वाढतं वायुप्रदूषण पाहता फटाके रात्री ८ ते १० पर्यंत वाजवण्यास उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.

वेळेचं उल्लंघन करून रहिवासी परिसरात फटाके फोडल्यास पोलिसांकडून कारवाई करत त्या व्यक्तीकडून दंड आकारण्यात येत आहे. या दंडाची रक्कम ५००० इतकी आहे. तर सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी दंडाची रक्कम ५,००० ते १२,५०० च्या दरम्यान करण्यात आलीये.

Firecrackers News
Kalyan Crime News: मारहाण करुन नागरीकांची लूट; दोन नशेखोर चोरट्याना सीसीटीव्हीच्या आधारे अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com