वसई - बाबोला परिसरात एका घरात चोरीची घटना घडल्यापासून अवघ्या २४ तासात वसई गुन्हे शाखेच्या युनिट २ ने चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तिघेही नेपाळचे रहिवासी आहेत. चोरी करून तिघेही नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले. पोलिसांनी आरोपींकडून 13 लाख 93 हजार किमतीचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम जप्त केली आहे.
या घटनेची माहिती देताना मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाचे उपायुक्त संजय पाटील म्हणाले की, 30 नोव्हेंबर रोजी वसईतील भाबोला कंपाऊंड घराच्या 6 दरवाजांचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले होते. घरातील लोक लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी बाहेर गेले होते.
हे देखील पहा -
या घटनेची माहिती वसई पोलिसांना मिळताच गुन्हे शाखा युनिट २ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून तात्काळ चार पथके बनवून आरोपींना पकडण्यासाठी सुरत, पनवेल व वसई परिसरात रवाना केले. चोरी करून आरोपी सुरतच्या दिशेने पळत असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सुरत ते गोध्रा असा 350 किमी अंतरापर्यंत आरोपींचा पाठलाग करून त्यांना गोध्रा येथून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी नेपाळचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपी सुरेंद्र अमृत बोगाटी, झापतसोप साबण, शेर बहादूर शाही यांना नेपाळला पळून जाण्यापूर्वी अटक करून 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 8 किलो चांदीचे दागिने, 10 घड्याळे, एक लॅपटॉप, एक आयपॉड आणि 1लाख24 रुपयांची असा एकूण 13लाख 93 हजार चा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.