Bullock Cart Race : राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत संपन्न; कोल्हापूरमधील गाडीचा प्रथम क्रमांक

तब्बल सात वर्षानंतर सर्वोच न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय दिल्यानंतरची राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) आज सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे पार पडली.
bullock cart race
bullock cart raceSaam TV

सांगली : तब्बल सात वर्षानंतर सर्वोच न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय दिल्यानंतरची राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) आज सांगलीच्या (Sangli) कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील माळ राणावरती  झाली. कोरोनाचे आणि न्यायालयाचे सर्व निर्बध पाळत ही बैलगाडा शर्यत पार पडली. या शर्यतीला लोकांची भली मोठी गर्दी झाली होता.

bullock cart race
फुकटचा प्रवास जीवावरती बेतला; टर्नस्टाईलमध्ये अडकून युवकाचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

ही तीन राउंड बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) होती, यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आणि बैलगाडा प्रेमी उपस्थित झाले होते. पंचक्रोशीतील बैलगाडी प्रेमी उपस्थित झाले होते. दरम्यान बंदी नंतरच्या या पहिल्याच शर्यतीचा नागोळे गावचा इतिहास नोंदवला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हे देखील पहा -

दरम्यान या शर्यतीत प्रथम क्रमांक संदीप पाटील कोल्हापूर (Kolhapur) यांनी पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांकाचा मान सांगलीच्या डफळापुर येथील अवि माने यांनी मिळवला. शर्यतींचा निकाल पार पडल्यावर उपस्थितीतांनी यावेळी एकच जल्लोष केला. तर महाराष्ट्र मधील पहिल्या शर्यती मध्ये आमचा विजय झाला आम्हाला याचा आनंद असल्याचे गाडीमालकांने सांगितले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com