बैलगाडा शर्यतबंदी विरोधातील लढा न्यायालयीन मार्गानेच लढावा लागणार : गृहमंत्री

बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी या पुढच्या काळात कशा पद्धतीने लढा दिला पाहिजे यासंदर्भात बैलगाडा मालक आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्यात चर्चा पार पडली.
बैलगाडा शर्यतबंदी विरोधातील लढा न्यायालयीन मार्गानेच लढवा लागणार :- गृहमंत्री
बैलगाडा शर्यतबंदी विरोधातील लढा न्यायालयीन मार्गानेच लढवा लागणार :- गृहमंत्रीSaamTv
Published On

खेड : बैलगाडा शर्यतबंदी विरोधातील लढा न्यायालयीन मार्गानेच सोडवावा लागणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सुप्रिम कोर्टात वकीलांमार्फत लवकरच सक्षम बाजू मांडण्याची तयारी सुरु केलीय, लवकर याबाबत तज्ञांच्या सल्ल्यानुसार कामाला सुरुवात केली जाईल असा विश्वास आज गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी बैलगाडा मालकांना दिला.

हे देखील पहा -

बैलगाडा शर्यतीवरून दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्यानंतर बैलगाडा मालकांच्या वतीने आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पारगाव येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता.

बैलगाडा शर्यतबंदी विरोधातील लढा न्यायालयीन मार्गानेच लढवा लागणार :- गृहमंत्री
भारतीय रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु : रावसाहेब दानवे

यावेळी आयोजित सत्कार समारंभात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी या पुढच्या काळात कशा पद्धतीने लढा दिला पाहिजे यासंदर्भात बैलगाडा मालक आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्यात चर्चा पार पडली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com