Buldhana Water Shortage : बुलढाणा जिल्ह्यात पाण्याचे संकट कायम; अजूनही ७० टँकर सुरु, दमदार पावसाची प्रतीक्षा

Buldhana News : पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र पावसाने बुलढाणा जिल्ह्याकडे पाठ फिरवली असून जिल्हा वासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे
Buldhana Water Shortage
Buldhana Water ShortageSaam tv
Published On

बुलढाणा : संपूर्ण राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. मात्र पश्चिम विदर्भात पावसाने दडी मारल्याने जिल्हा वासियांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. चांगला पाऊस न झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठले आहेत. परिणामी आजही जिल्ह्यात पाणी संकट कायम असून ७० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

Buldhana Water Shortage
Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; कृष्णा नदीची पाणीपातळी १८ फुटांवर, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग

पावसाळ्याचे (Rain) दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र पावसाने बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याकडे पाठ फिरवली असून जिल्हा वासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाऊस नसल्याने पाण्याची पातळी खालावली असून नागरिकांना पिण्यासाठी पाणी वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही. यामुळे आजही जिल्ह्यात ७० ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केल्या जात असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या आहेत. याबाबत माहिती दिली जात नसल्याने जिल्हावासीय चिंतेत आहे.

Buldhana Water Shortage
Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरातील ऑनलाइन सशुल्क दर्शन पासला विरोध; सुविधा रद्द करण्याची पुजारी बांधवांची मंदिर संस्थानकडे मागणी

धरणातील साठा झाला कमी 

उन्हाळ्यातील भीषण टंचाईनंतर (Water crisis) पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न सुटेल अशी आशा जिल्हा वासियांना होती. मात्र पावसाळ्याच्या दोन महिन्यानंतर देखील जिल्हावासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प, ७ मध्यम प्रकल्प आणि ९८ लघु प्रकल्प असून या सर्व प्रकल्पात पाणी साठा ० टक्के शिल्लक राहिला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी चिंता आता अधिक वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com