Buldhana News : वादळाने घेतला तरुणाचा बळी! झाडाची फांदी अंगावर पडून मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न

Buldhana Local News Updates : किशोर ज्ञानेश्वर खोडके असे २४ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे असून तो खामगाव तालुक्यातील माटरगाव येथील रहिवासी होता.
Buldhana Latest News in Marathi
Buldhana Latest News in Marathisaam tv

Buldhana Latest News in Marathi : बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारी ठिकठिकाणी वादळाचा तडाखा बसला. खामगाव तालुक्यातील माटरगावात या वादळाने एका तरुणाचा बळी घेतला. शेतातील निंबाच्या झाडाची फांदी अंगावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किशोर ज्ञानेश्वर खोडके असे २४ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे असून तो खामगाव तालुक्यातील माटरगाव येथील रहिवासी होता.

किशोर खोडके हा शेतात काम करीत होता. अचानक तुफान वादळ आल्याने शेतात काम करित असतान निंबाच्या झाडाची मोठी फांदी किशोरच्या अंगावर पडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. किशोरचं एक महिन्याआधीच लग्न झालं होतं. या दुर्दैवी घटनेने माटरगाववर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Buldhana Latest News in Marathi
Sandhan Valley: मोठी बातमी! जगप्रसिद्ध सांदण दरीत अडकले 500 पर्यंटक, Video...

चालत्या गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू

राज्यात आज अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळात तळोदा-चिनोदा रस्त्यावर चालत्या गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर गाडीतील दोघेजण जखमी झाले. (Breaking News)

Buldhana Latest News in Marathi
Bihar Bridge collapses : बिहारच्या भागलपूरमध्ये दुसऱ्यांदा कोसळला निर्माणाधीन पूल! संपूर्ण घटना Video मध्ये कैद

राजेंद्र मराठे हे इतर दोन जणांसोबत तळोद्याकडून चिनोदा गावाकडे जात असताना त्यांच्या वाहनावर अचानक झाड कोसळले. या घटनेत राजेंद्र मराठे यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन जण जखमी झाले. वाहनावर झाड पडल्याची घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांवरील जीर्ण झाडांचा प्रश्न या घटनेतून समोर आला आहे. तळोदा तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com