Ravikant Tupkar News: सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल; रविकांत तुपकर यांचा निशाणा

Buldhana News : सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल; रविकांत तुपकर यांचा निशाणा
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSaam tv
Published On

संजय जाधव 
बुलढाणा
: राज्यातील सोयाबीन, कापूस शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन घटणार (Buldhana) आहे, खर्च दुप्पट तर उत्पादन अत्यल्प. तसेच भाव सुद्धा मिळणार नाही. यामुळे आज (Farmer) शेतकरी अडचणीतच नाही तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांना काही घेणे देणे नाही. आता जस कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्र्यांना अडविले आहे. तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी या सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही; अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते (Ravikant Tupkar) रविकांत तुपकर यांनी दिली. (Maharashtra News)

Ravikant Tupkar
Chilli Price: मिरचीचे दर झाले कमी; मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत

पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तर कापसाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तुपकर म्हणाले कि, येत्या काळात राज्यकर्त्यांना शेतमालाच्या घसलेल्या भावांमुळं रोषाला सामोरं जावं लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा, टोमॅटो उत्पादकांनी अजित पवारांचीच (Ajit Pawar) वाट अडवली. येत्या काळात सोयाबीन उत्पादक पट्ट्यात अर्थात विदर्भात बाजारभाव कमी असल्यानं शेतकरी आक्रमक होऊ शकतात. 

Ravikant Tupkar
Nandurbar News : गुजरातहून अवैद्य गुटख्याची वाहतूक; नंदुरबार पोलीसांकडून १९ लाखांचा गुटखा जप्त

भाजपला अधिक फटका 

भाजपचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेल्या विदर्भात भाजप नेत्यांना याचा फटका बसू शकतो. याचा प्रत्यय काल नाशिक जिल्ह्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कांदा, टोमॅटो भाजीपाल्याच्या पिकांचे शेतकरी सतत संकटात आहेत. तर गेल्या २ वर्षांपासून कापूस आणि सोयाबीनला भाव नसल्यानं यंदाही तीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे तुपकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com