Buldhana: तपास यंत्राणेकडून पीएफआय पदाधिकाऱ्यांच्या घराची झाडाझडती

तपास यंत्राणेकडून पीएफआय पदाधिकाऱ्यांच्या घराची झाडाझडती
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पीएफआय संघटनेच्या बुलडाणा (Buldhana) जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांच्या घराच्या झाडाझडती जिल्हा तपास यंत्राणाकडून (Police) आज सकाळपासून करण्यात येत आहे. (Buldhana Today News)

Buldhana News
Jalgaon News: खडसेंनी समोर येवून सांगावे; गिरीश महाजनांचे आव्‍हान

पीएफआय संघटनेच्या पदाधिकारींमध्‍ये सर्वात पहिले इखलास खान समीर खान याच्या जोहरनगर येथील घराची झडती घेतली. यानंतर पीएफआय संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदावर असलेले मौलाना रईस शेख यांच्या कमेला परिसरात असलेले घराची घडती घेण्यात आली. पीएफआय संघटनेतील एकूण 8 पदाधिकाऱ्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

झाडाझडतीमध्ये देश विरोधी कारवाईमध्ये या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता का? याची चौकशी करण्यात येत आहे. तपास यंत्रणेमध्ये महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्यासह बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे दहशतवादी विरोधी पथक यांच्यासह नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी हे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com