Buldhana News: शेगावच्या लेकीचा दिल्लीत डंका! गायत्री रोहणकरने पटकावला फॅशन आयकॉन पुरस्कार; स्पर्धेतील रॅम्प वॉकने घातली भुरळ

Fashion Icons Award 2023: संबंधीत क्षेत्राचा गंधही नसताना, प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर गायत्रीने हे यश संपादन केले आहे.
Buldhana News
Buldhana NewsSaamtv
Published On

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव च्या गायत्री रोहणकार (Gayatri Rohankar) हीने राजधानी दिल्लीत झालेल्या एका स्पर्धेत उत्कृष्ट व दिलखेचक रॅम्प वॉक सादर करुन अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत त्यांना भुरळ घातली. सोबतच फॅशन आयकॉन्स पुरस्कार पटकावित देशात शेगावच नाही तर बुलडाणा जिल्ह्याचा नावलौकीक वाढविला. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून गायत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Latest Marathi News)

Buldhana News
Weather Forecast: गारपीटीनंतर आता विदर्भाला उन्हाचे चटके! तापमान 45 पार जाण्याची शक्यता

शेगाव (Shegaon) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या गायत्री रोहणकरने प्राथमिक शिक्षण अकोला येथे घेतले. तर पद्वीचे शिक्षण खामगाव येथे पूर्ण केले. फॅशनचा कोणताही गंध व मार्गदर्शन नसतांना गायत्रीने अल्पावधीतच स्वत:च्या हिंमत व बळावर या क्षेत्रात आपल्या नावाचीच नव्हे तर जिल्ह्याची छाप उमटवली. सोबतच तिला नुकताच वसुंधरा गाझियाबाद (Delhi)) च्या रॉयल पॅलेसमध्ये स्टायलिश फॅशन आयकॉन्स पुरस्कार-२०२३ ने सन्मानित करण्यात आले.

Buldhana News
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray Barsu Visit : राज्य पेटवायची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही; उद्धव ठाकरेंवर शिरसट बरसले (पाहा व्हिडिओ)

या पुरस्कारामुळे संतनगरी शेगावसह बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक असून गायत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संबंधीत क्षेत्राचा गंधही नसतांना, प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर गायत्रीने हे यश संपादन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com