बांधकाम परवानगी न मिळाल्याने नागरिकाने ओतले अंगावर रॉकेल

बांधकाम परवानगी न मिळाल्याने नागरिकाने ओतले अंगावर रॉकेल
Buldhana
BuldhanaSaam tv
Published On

बुलढाणा : नवीन घर बांधकामासाठी परवानगीला अभियंता योगेश देशमुख मंजुरी देत नसल्याचा आरोप करीत बुलढाणा शहरातील एका नागरिकाने नगरपरिषदेच्या परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित समाजसेवक व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसावधन ठेवत या नागरिकांच्या हातातील रॉकेलची (Kerosene) कैन हिसकून आत्मदहनापासून परावृत्त केले. अंगावर घेतलेल्या नागरिकांचे हाजी मो.अकिल असे नाव आहे. (buldhana news construction permission was not obtained the citizen poured kerosene on his body)

Buldhana
भाजपचे यश; धुळ्यात फटाके फोडून जल्लोष

मलकापूर रोड (Buldhana) जवळील खालिद बिन वलीद नगरमध्ये १७१ स्वेअर मिटर जागेत बांधकाम परवानगीसाठी हाजी मो. अकिल यांनी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागात सर्व कागदपत्रे सादर करून अर्ज सादर केले होते. नियमानुसार सुरुवातीला नगर परिषदेतील (Buldhana Nagar parishad) बांधकाम विभागातील टाऊन प्लॅनिंग अभियंता सिमीका बोके यांनी ले-आऊटचे कागदपत्रे तपासून मंजुरी दिली. पुढे अभियंता निलेश इंगळे यांनी सर्व कागदपत्रे तपासून मंजुरी दिली.

नकाशा तपासून परवानगी देत नसल्‍याचा आरोप

पुढील बांधकाम करण्यात येत असलेल्या जागेच्या नकाशा तपासणी प्रक्रियेत अभियंता योगेश देशमुख यांनी वारंवार सांगूनही नकाशा तपासून परवानगी देत नाही; असा आरोप करीत हाजी मो.अकिल यांनी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासमोर अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र यावेळी नगर परिषदेत उपस्थित नगरसेविका यांचे पती समाजसेवक मोहम्मद अजहर व नगर परिषदेचे कर्मचारी शिवा बेंडवाल यांनी व परिसरात उपस्थित असलेले कर्मचाऱ्यांनी व काही नागरिकांनी प्रसावधन ठेवत हाजी मो.अकिल यांच्या हातातील रॉकेलची कैन हिसकून आत्मदहनापासून परावृत्त केले व त्यांची समजूत काढली.

तातडीने तपासणी करून मंजूरी

दरम्यान हाजी मो. अकिल यांना बांधकाम करण्यात येत असलेल्या जागेच्या नकाशाची तातडीने तपासणी करून अभियंता योगेश देशमुख यांनी मंजुरी दिली. हाजी मो.अकिल यांना 160.64 स्वेअर मिटर जागेची नगर परिषदेला भरण्यात येत असलेल्या ३७ हजार ३३७ रुपयांची चलान देण्यात आली. प्रकरणी अभियंता योगेश देशमुख यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले मी हाजी.मो.अकिल यांच्या बांधकाम परवानगीचा नकाशाची तपासणी करून त्यांना काल सोमवारीच परवानगी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com